Inside Story: फडणवीस 'वर्षा'वर.. शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा, शिंदे मंत्रिमंडळात राहणार की नाही?

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

फडणवीसांच्या शपथविधीसाठी अवघे काही तास शिल्लक

point

सरकारमध्ये सहभागी व्हायचं की नाही? शिंदेंचं अजूनही काहीच ठरलं नाही

point

'वर्षा' बंगल्यावर बंद दाराआड शिंदे-फडणवीसांसोबत चर्चा

Eknath Shinde-Devendra Fadnavis: मुंबई: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे उद्या (5 डिसेंबर) शपथ घेणार आहेत. मात्र, असं असलं तरी एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये सहभागी होणार आहेत की नाही याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळेच पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे 'वर्षा' बंगल्यावर दाखल झाले आहेत. मागील अर्धा तासापासून दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात राहायचं की नाही हे याच बैठकीनंतर जाहीर केलं जाईल. 

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. ज्यानंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये फडणवीसांनी असंही म्हटलं की, शिंदे सरकारमध्ये यावे यासाठी त्यांना विनंती करण्यात आली आहे.

हे ही वाचा>> Ajit Pawar Vs Eknath Shinde : 'मी तर शपथ घेणार, त्यांचं काही...' अजितदादांचा टोला, शिंदे म्हणाले; 'दादांना सकाळी-संध्याकाळ...'

सरकारमध्ये सामील होणार की नाही? शिंदेंनी कोणतंही ठोस उत्तर दिलं नाही.. 

दरम्याना, फडणवीसांनी असं जाहीरपणे सांगितल्यानंतर देखील शिंदेंनी आपला कुठलाही निर्णय जाहीर केला नाही. ते पत्रकार परिषदेत फक्त म्हणाले की, 'आम्ही सांगितलं ना की, संध्याकाळी सांगतो तुम्हाला. देवेंद्रजी माझ्याकडे आले हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. मी त्यांना धन्यवाद देतो. मी सगळ्यांचा आदर करतो.' असं शिंदे यावेळी म्हणाले. 

हे वाचलं का?

शपथविधीवरून अजितदादांचा टोला, शिंदेंकडूनही लागलीच प्रतिटोला! 

याच पत्रकार परिषदेत अजितदादा आणि शिंदेंमध्ये टोलेबाजी पाहायला मिळाली. तुम्ही आणि अजितदादा हे उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का? असा सवाल या दोन्ही नेत्यांना विचारण्यात आला. 

त्यावर शिंदे म्हणाले की, 'अरे मी आणि देवेंद्रजींनी आताच सांगितलं की, थांबा जरा.. उद्या शपथविधी आहे ना.. तर संध्याकाळपर्यंत थांबा..'

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Devendra Fadnavis : मध्यप्रदेश, राजस्थानचा फॉर्म्युला महाराष्ट्रात का नाही चालला? फडणवीस पुन्हा येण्याची 10 कारणं

तर त्यांना मध्येच थांबवत अजित पवार म्हणाले की, 'संधाकाळपर्यंत त्यांचं समजेल आपल्याला.. मी तर शपथ घेणार आहे. मी थांबणार नाही.' अजित पवारांच्या याच टोल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

ADVERTISEMENT

पण त्यावर शिंदेंनीही तात्काळ प्रतिउत्तर देत म्हटलं की, 'अरे दादांना अनुभव आहे.. सकाळीही शपथ घेण्याचा आणि संध्याकाळीही शपथ घेण्याचा..' असं ते म्हणाले.

शिंदेंना फडणवीसांनी काय केली विनंती?

पत्रकार परिषदेत बोलताना सुरुवातीलाच फडणवीस म्हणाले की, 'मागील काळातही आम्ही एकत्रितपणे निकाल घेतले आहेत. पण मुख्यमंत्री पद किंवा उपमुख्यमंत्री पद ही एक प्रकारची तांत्रिक व्यवस्था आहे. आम्ही आतापर्यंत एकत्रितपणे निर्णय घेत आले आहोत. पुढेही तसेच निर्णय घेतले जातील असा मला विश्वास आहे.' 

'मी स्वत: काल मुख्यमंत्री एकनाथराव यांना भेटून त्यांना विनंती केली की, त्यांनी शिवसेनेच्या वतीने मंत्रिमंडळात राहावं. मी त्यांना हे देखील सांगितलं की, शिवसेनेच्या आमदारांची, महायुतीच्या आमदारांचीही इच्छा आहे. त्यामुळे त्यांचा सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळेल. अशी मला पूर्ण खात्री आहे.' असं ते म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT