Jayashree Thorat: "त्यांना सरळ करण्याचं काम...", वसंतराव देशमुखांच्या आक्षेपार्ह विधानानंतर जयश्री थोरात संतापल्या
Jayshree Thorat On Vasantrao Deshmukh: अहिल्यानगरच्य संगमनेरमध्ये भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या सुकन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
जयश्री थोरात यांच्याबद्दल बोलताना वसंतराव देशमुखांची जीभ घसरली
जयश्री थोरात यांनी वसंतराव देशमुखांना सुनावलं
माध्यमांशी बोलताना जयश्री थोरात नेमकं काय म्हणाल्या?
Jayshree Thorat On Vasantrao Deshmukh: अहिल्यानगरच्य संगमनेरमध्ये भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या सुकन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. देशमुखांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल बोलताना पातळी सोडल्यानं संगमनेरमध्ये राडा झाला. संगमनेरच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत वाहनांची जाळपोळ केली. तसच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात ठिय्याच मांडला. त्यानंतर वसंतराव देशमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
ADVERTISEMENT
या गंभीर प्रकाराबाबत जयश्री थोरात यांनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली आहे. "एव्हढ्या खालच्या पातळीवर जाऊन तुमच्या नातीच्या वयाच्या मुलीबद्दल तुम्ही असं बोलताय, ते त्यांना शोभणारं नाही आणि माझ्या आजोबांनी त्यांना आधीसुद्धा खडकावून काढलं आहे. त्यांना सरळ करण्याचं काम केलं होतं. महिलांनी सुद्धा त्यांच्यावर मोर्चा नेला होता", असं म्हणत जयश्री थोरात यांनी वसंत देशमुख यांच्यावर सडकून टीका केली.
जयश्री थोरात माध्यमांशी बोलताना काय म्हणाल्या?
"काल जे काही घडलं, ते अतिशय वाईट आहे. जे काही झालं आहे, ते कुणालाही न शोभणारं आहे. राजकारणात महिलांना 50 टक्के आरक्षण द्यायचं, पण असं बोलणारे लोक असतील, तर महिलांनी का बरं राजकारणात यावं? मी काय वाईट करत होते? मी माझ्या वडिलांसाठी मैदानात होते. मी माझ्या वडिलांसाठी युवा संवाद यात्रेत प्रत्येक माणसाला भेटण्याचं काम करत होते. प्रत्येक युवकाला भेटण्याचं काम करत होते. मी असं काय केलं होतं की, माझ्याबद्दल एव्हढं वाईट बोललं पाहिजे. त्यांच्या वयाला शोभणारं हे वक्तव्य आहे का? तुम्ही कार्यक्रमाचे अध्यक्ष आहात आणि भाषणात तुम्ही किती खालच्या पातळीवर बोलतात. त्यांच्या वयाला शोभणारं नाही, कुणालाच शोभणारं नाही ते.
हे ही वाचा >> Congress Candidates 2nd List: काँग्रेसची दुसरी यादी आली समोर, MVA मध्ये नवं राजकारण?
देशमुख एका महिलेविषयी बोलताना या पातळीवर जाऊन बोलतील, असं अपेक्षित नव्हतं, या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना थोरात म्हणाल्या, ते विरोधक राहिले आहेत. पण विरोधकाला पण एक पातळी असते. एव्हढ्या खालच्या पातळीवर जाऊन तुमच्या नातीच्या वयाच्या मुलीबद्दल तुम्ही असं बोलताय, ते त्यांना शोभणारं नाही आणि माझ्या आजोबांनी त्यांना आधीसुद्धा खडकावून काढलं आहे. त्यांना सरळ करण्याचं काम केलं होतं. महिलांनी सुद्धा त्यांच्यावर मोर्चा नेला होता. अशा माणसाला जेव्हा ते कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान देतात. तेव्हा ते काय विचार करत होते, असा मला प्रश्न पडतो.
हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! डिसेंबरचे 1500 कधी मिळणार? सरकारने दिली सर्वात मोठी अपडेट
या सर्व प्रकरणात जे कुणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करा, असं सुजय विखे पाटील म्हणाले आहेत, यावर थोरात म्हणाल्या, "मला एव्हढच त्यांना सांगायचं आहे की, त्यांच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बोलत होते. त्यांनी जी भाषणं मागच्या काही दिवसात केलेली आहेत, ती तपासून घेतली पाहिजेत. त्यांनी पातळी सोडून माझ्यावर भाषणं केलेली आहेत. साकूर गावात त्यांनी माझ्यावर काय टीका केल्या आहेत, ते सुद्धा युवा नेते आहेत. स्वत:ला युवा नेता म्हणतात, तेव्हा त्यांनी एक पातळी जपली पाहिजे"
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT