Ajit Pawar : ''अरे शहाण्यांनो...'', अजित पवारांनी विरोधकांना भरला दम

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojan ajit pawar criticize opposition leader maha vikas aghadi mukhymantri majhi ladki bahin yojana scheme maharashtra politics
अजित पवारांनी विरोधकांना भरला दम
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवारांनी विरोधकांवर जोरदार टीका केली

point

सरकारने भावांकडे पण लक्ष दिले आहे

point

भावांच्या व्यवसायाला आमची मदत नाही का?

Ajit Pawar On Maha vikas aghadi : ओंकार वाबळे, पुणे :  महायुती सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेवरून (mukhymantri majhi ladki bahin yojana scheme) टीका करताना विरोधकांनी बहिणींसाठी योजना आणलीत, पण भावांचं काय? असा सवाल करत सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं होतं. यावर आता विरोधकांना उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) प्रत्युत्तर दिले आहे. 'अरे शहाण्यांनो कोणी सांगितलं तुम्हाला भावांकडे लक्ष नाही, भावांकडे पण लक्ष दिले आहे', असे म्हणत अजित पवारांनी भावांसाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. ( ladki bahin yojan ajit pawar criticize opposition leader maha vikas aghadi mukhymantri majhi ladki bahin yojana scheme maharashtra politics)

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. यावेळी बोलताना अजित पवारांनी विरोधकांवर जोरदार टीका केली होती.  ''विरोधक कारण नसताना टीका टिप्पणी करतात. पहिल्यांदा काय म्हणाले, अरे माझी लाडकी बहीण योजना आणली पण भावांकडे तर यांचं लक्षच नाही. अरे शहाण्यांनो कोणी सांगितलं तुम्हाला भावांकडे लक्ष नाही, भावांकडे पण लक्ष दिले आहे'', असे अजित पवारांनी सांगितले.  

हे ही वाचा : Uddhav Thackeray: 'दिल्लीच्या मालकाची सुपारी घेऊन...', ठाकरेंची अदानी-लोढांवर जहरी शब्दात टीका!

''तीन, पाच, साडेसात हॉर्स पॉवरच्या मोटारला भावांच्याकरता संपूर्ण वीज माफी दिली आहे. त्यामुळे इथून पुढे त्यांनी वीजबील भरायचं नाही. कोण तुमचं वीज बील तोडणार नाहीत, असे देखील अजित पवारांनी सांगितले. तसेच ''मला महाराष्ट्रातल्या बळीराजाला सांगायचंय एकही आमचा लाईनमन येणार नाही, आणि तुमचं तीन, पाच, साडेसात हॉर्स पॉवरचं बील भरलं नाही म्हणून कनेक्शन तोडणार नाही. त्यामुळे हे भावांसाठी नाही का केलं? असा सवाल अजित पवारांनी विरोधकांना केला. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अजित पवार पुढे म्हणाले, ''दुधाचा धंदा अडचणीत आला असताना, दुधाचे दर कमी आहेत, लीटरला 5 रूपये जास्त अनुदान सरकार देते. हा भावांच्या व्यवसायाला आमची मदत नाही का? असे देखील अजित पवारांनी विरोधकांना लक्ष्य करत सांगितलं. 

हे ही वाचा : Maharashtra Survey Poll: पुन्हा येणार महायुतीचं सरकार, पण... बुचकळ्यात टाकणारा ओपिनियन पोल

विरोधकांनी या योजनेला विरोध केला. काही जण कोर्टात देखील गेले, पण कोर्टात पण टीकलं नाही. त्यानंतर ही योजना तात्पुर्ती आहे, असा प्रचार करायला लागले. पण मी सांगतो, अजून आमच्या सरकारचे पाच महिने आहेत, हे पाच महिन्याचे तुम्हाला साडे सात हजार तर मिळतीलच. परंतू हे सातत्य टीकवायंच, तर बहिणींनो हे तुमच्या हातात आहे. त्यामुळे तुम्ही महायुतीला संधी, पाठबळ द्या,असे आवाहन अजित पवारांनी लाडक्या बहिणींना केले आहे. 

ADVERTISEMENT

लोकसभेत खोटं नाट सांगितलं सविधान बदलणार अमुक करणाक तमुक करणार, त्यामुळे वेगळा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. आता मात्र त्याला बळी पडायचं नाही, असे आवाहन अजित पवारांनी महिला वर्गाला केले.

ADVERTISEMENT

भाजप नेत्याच्या घेतल्या कानपिचक्या 

कधी कधी महायुतीचे सहकारी पण उत्साहाच्या भरात सांगतात. हे आम्ही तुम्हाला दिलंय परंतू काही वेगळं केलंत, तर आम्ही परत घेऊ. पण मी तिघांच्या साक्षीने सांगतो हे पैसे भाऊबीज म्हणून तुम्हाला दिलेले आहे, हे पैसे परत घेण्याकरता दिलेले नाही, त्यामुळे कुणी काही वेगळं बोलत असतील तर त्यावर विश्वास ठेवू नका. आणि कोणी बोलत असेल तर सरळ त्यांना सांगा, आम्हाला तिघा भावांनी सांगितलं आहे, कुणी आम्हाला दिलेल कुणी आमचं काढून घेऊ शकत नाही. जी दिलेली ओवाळणी आहे ती तुमच्याकडे राहणार आहे, असे अजित पवारांनी महिलांना स्पष्ट सांगितले. 
 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT