Shamibha Patil : श्माम ते शमिभा...वंचितच्या तृतीयपंथीय उमेदवार कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

maharashtra assembly election 2024 who is vbc vidhan sabha raver constituency transgender candidat shamibha patil vanchit candidate list
शमिभा पाटील या तृतीयपंथी असून एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आंबेडकरांनी एक तृतीयपंथी उमेदवार मैदानात उतरवला आहे.

point

शमिभा पाटील असे या उमेदवाराचे नाव आहे.

point

रावेर मतदार संघातून हा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

Who is Shamibha Patil : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षानी कंबर कसली आहे. आणि पितृपक्षानंतर या पक्षाचे उमेदवार जाहिर होण्याची शक्यता आहे. असे असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आज विधानसभा निवडणुकीसाठी 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या 11 पैकी आंबेडकरांनी एक तृतीयपंथी उमेदवार मैदानात उतरवला आहे. शमिभा पाटील (Shamibha Patil) असे या उमेदवाराचे नाव आहे. त्यांना रावेर मतदारसंघातून (raver constituency) विधानसभेचे तिकीट देण्यात आला आहे. त्यामुळे या उमेदवाराची चांगलीच चर्चा आहे. आता वंचितच्या तृतीयपंथी उमेदवार असलेल्या शमिभा पाटील कोण आहेत? हे जाणून घेऊयात. (maharashtra assembly election 2024 who is vbc vidhan sabha raver constituency transgender candidat shamibha patil vanchit candidate list)

कोण आहेत शमिभा पाटील? 

शमिभा पाटील या तृतीयपंथी असून एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. 2008 पासून त्या जळगावमध्ये सामाजिक कार्यकर्त्या म्हणून काम करत आहेत. 

शमिभा यांचे पुर्वीचे नाव श्याम मीना भानुदास पाटील असे होते. त्यांनी नंतर शमिभा नाव धारण केले. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शमिभा यांनी वयाच्या 30 व्या वर्षी आपण तृतीयपंथी असल्याचे सार्वजनिक केले होते. 

शमिभा या उच्च शिक्षित असून त्यांनी मराठी विषयात एम.ए केले आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : पुण्यात अख्खा ट्रक खड्ड्यात.. शिंदे-फडणवीसांवर पुणेरी टीका, पवार गटाने डिवचलं!

सध्या त्या कवी ग्रेस यांच्या साहित्याचा पूर्वभ्यास यावर पी.एचडी करत आहे. 

ADVERTISEMENT

शमिभा यांनी फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले आहे. 

शमिभा या सामाजिक कार्यकर्त्या असून तृतीयपंथीयांसाठी काम करतात

तृतीयपंथीय हक्क अधिकार समितीच्या त्या राज्य समन्वयक आहेत. तसेच त्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश कार्यकारणीच्या सदस्या आहेत.

आदिवासींचे वनहक्क, फैजपूरसह ग्रामीण भागातील झोपडपट्टीतील पुनर्वसन, रेशन अधिकार कृती समिती, केळी कामगार संघटना,  गायरानधारकांचे अधिकार, बेघर हक्क निवारा यासह तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी त्या लढत आहेत. 

कोण आहेत वंचितचे 11 उमेदवार   

  1. रावेर : शमिभा पाटील (तृतीय पंथी/ लेवा पाटील), 
  2. सिंदखेड राजा : सविता मुंढे (वंजारी),
  3. वाशिम : मेघा किरण डोंगरे (बौद्ध), 
  4. धामणगाव : नीलेश विश्वकर्मा (लोहार), 
  5. नागपूर दक्षिण पश्चिम : विनय भांगे (बौद्ध), 
  6. साकोली : डॉ. अविनाश नन्हे (धीवर), 
  7. नांदेड दक्षिण : फारूक अहमद (मुस्लीम), 
  8. लोहा : शिवा नारांगले (लिंगायत ), 
  9. औरंगाबाद पूर्व : विकास दांडगे (मराठा),
  10. शेवगाव : किसन चव्हाण (पारधी), 
  11. खानापूर : संग्राम माने ( वडार) 

 हे ही वाचा : Mumbai University : 'उद्याच निवडणूक घ्या...', मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवर हायकोर्टाचे आदेश

विधानसभेत कोणालाही पाठिंबा देणार नाही

आमच्या पवित्र विचारधारेशी खंबीर राहून, खरे प्रतिनिधित्व आणि राजकीय सत्ता मिळवण्याचा आणि काही कुटुंबाचे वर्चस्व मोडून आम्ही वंचित बहुजन समूहांना प्रतिनिधित्व दिले असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी यावेळी सांगितले आहे. येत्या काही दिवसांत दुसरी यादी जाहीर करण्यात येईल. तसेच आणखी काही पक्ष लवकरच आमच्या आघाडीत सामील होतील, असेही आंबेडकर यांनी सांगितले.

संयुक्त जाहीरनामा आणि वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा निवडणुकीची सूचना येण्याआधीच आम्ही प्रसिद्ध करणार असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी सांगितले आहे. मागच्या वेळी काँग्रेसमधील काही उमेदवारांनी पाठिंबा मागितला. आम्ही पाठिंबा दिला. आता या निवडणुकीत कोणीही पाठिंबा मागितला तर आम्ही देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT