Mumbai University : 'उद्याच निवडणूक घ्या...', मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवर हायकोर्टाचे आदेश
Mumbai University Senet Election : मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणूका शुक्रवारी अचानक रद्द करण्यात आल्या होत्या. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने कोर्टात धाव घेतली होती. ठाकरे गटाने मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणूकीच्या स्थगितीला कोर्टात आव्हान दिलं होतं. कोर्टात आज यावर सुनावणी पार पडली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सिनेटच्या निवडणुका उद्याच होणार
हायकोर्टाचे मुंबई विद्यापीठाला आदेश
हायकोर्टाने सुनावणीत मुंबई विद्यापीठाला फटकारलं
Mumbai University Senet Election : मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणूका (Senet Election) उद्याच घेण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) दिले आहेत. मुंबई विद्यापीठाने सिनेटच्या निवडणुका या पुढे ढकलल्या होत्या. विद्यापीठाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने (Shiv Sena Ubt) कोर्टात धाव घेतली होती. आणि सिनेटच्या निवडणूकीच्या स्थगितीच्या निर्णयाला कोर्टात आव्हान दिले होते.अखेर यावर मुंबई हायकोर्टाने सिनेटच्या निवडणूका या उद्याच घ्याव्या लागणार असे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता रविवारी 22 सप्टेंबरलाच मुंबई विद्यापीठाची निवडणूक होणार आहे. (mumbai university senet election postpone high court big decision thackeray group big relief)
ADVERTISEMENT
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीला दुसऱ्यांदा स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली होती. आणि निवडणुकीच्या स्थगितीच्या निर्णयाला आव्हान देण्यात दिलं होते. त्यानंतर ए एस चांदोरकर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी आज पार पडली. यावेळी ठाकरे गटाच्या वतीने सिद्धार्थ मेहता यांनी बाजू मांडली होती. या सुनावणीत हायकोर्टाने मुंबई विद्यापीठाला फटकारलं आहे. तसेच सिनेटच्या निवडणूका उद्याच घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता रविवारी 22 सप्टेंबरलाच मुंबई विद्यापीठाची निवडणूक होणार आहे. हायकोर्टाच्या निर्णयाने ठाकरे गटाला दिलासा मिळाला आहे.
हे ही वाचा : Shivdeep Lande : 'माझं नाव कुणाशीही जोडू नका', राजीनाम्यानंतर अखेर IPS शिवदीप लांडेंनी सगळं क्लिअर केलं!
दरम्यान शुक्रवारी विद्यापीठाच्या निवडणूक पुढे ढकलण्याच्या निर्णयावरून आदित्य ठाकरे हे चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी एक्स या सोशल मीडियावरून शिंदे सरकारवर जोरदार टीका केली होती. 'असे घाबरट गद्दार मिंधे मुख्यमंत्री आणि अकार्यक्षम शिक्षणमंत्री असले की तरुणांच्या ताकदीला असेच घाबरतात! 22 तारखेला होणारी सिनेट निवडणुक 'सरकारच्या आदेशावरुन रद्द केली'... डरते रहो, यह डर अच्छा हैं! लेकिन हम अपने लोकतंत्र के लिए लड़ेंगे और जीतेंगे!, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेवर जोरदार टीका केली होती.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
''डरपोक शिंदे सरकार''
''शिवसेना या निवडणुकीत पूर्ण ताकतीने उतरली आहे आणि सर्वच्या सर्व जागा या निवडणुकीतल्या शिवसेना जिंकत आहे हे दिसून आल्यावर डरपोक शिंदे सरकारने डरपोक हा शब्द यासाठी वापरत आहे की त्यांना कोणत्याही निवडणुकीला सामोरे जाण्याचे हिंमत नाही हे सातत्याने पाहिले असेल'', असा शब्दात संजय राऊतांनी निवडणुकीवरून शिदेंवर हल्ला चढवला होता.
''जिथे पैशाची मस्ती चालते तिथेच हे निवडणुकीला सामोरे जातात पण हा सुशिक्षित तरुण वर्ग आहे हा इथे मतदान करतो आणि आपलं विद्यापीठ यूनिवर्सिटी मुंबईची एक दिशादर्शक काम करतो हे निवडणूक आपण हरतो आहे हे लक्षात आल्यावर डरपोक शिंदे सरकारने ही निवडणूक दुसऱ्यांदा रद्द केली'' असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : IT Rule amendments : मुंबई हायकोर्टाचा केंद्राला मोठा झटका, Fact Check ला ठरवलं घटनाबाह्य
''पंतप्रधान मोदी एक देश एक निवडणूक या योजनेची ढोल वाजवतात पण आमच्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका घेण्यामध्ये त्यांचे हिंमत नाही. ज्या निवडणुका तुम्ही पैशाच्या जोरावर जिंकू शकता ईव्हीएमचा गैरवापर करून जिंकू शकता पोलीस नियंत्रणाचा वापर करून जिंकू शकता अशाच निवडणुकीला तुम्ही सामोरे जाणार आहात'', असा टोला देखील राऊतांनी शिंदेंना लगावला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT