Majhi Ladki Bahin Yojana कधीपर्यंत सुरू राहणार? अजित पवारांनी बारामतीत सांगून टाकलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

majhi ladaki bahin yojana when will the continue ajit pawar big statement 1500rs month eknath shinde mahayuti government
बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जनसन्मान महामेळावा पार पडला आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जनसन्मान महामेळावा

point

विधानसभा निवडणुकीत तुम्हाला महायुतीला निवडून द्यायचं आहे

point

हा अजितदादा शब्दाचा पक्का आहे.

Ajit Pawar on Majhi Ladaki Bahin Yojana : राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून 21 ते 65 वयोगटातील महिला, मुलांना दरमहा 1500 रूपये मिळणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी कागदपत्राची जुळवाजुळव आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरूवात केली आहे. त्यात आता अजित पवारांनी (Ajit Pawar) ही योजना नेमकी कधीपर्यंत सुरु राहणार आहे? याबाबतची मोठी माहिती बारामतीतून (Baramati) दिली आहे. (majhi ladaki bahin yojana when will the continue ajit pawar big statement 1500rs month eknath shinde mahayuti government) 

बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जनसन्मान महामेळावा पार पडला आहे. या मेळाव्यातून लाडकी बहीण योजनेवर बोलताना अजित पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत तुम्हाला महायुतीला निवडून द्यायचं आहे, तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत आणि ही योजना पुढे चालणार आहे,असे अजित पवारांनी स्पष्टच सांगितले. तसेच  हवसे,नवसे, गवसे येतील काही सांगायचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. हा अजितदादा शब्दाचा पक्का आहे. कुठे बदलणार नाही, असा विश्वास  देखील अजित पवारांनी महिला वर्गाला दिला. 

हे ही वाचा : Pooja Khedkar : IAS पूजा खेडकरांचा नवा प्रताप, MBBS प्रवेशासाठी केला होता मोठा झोल?

येत्या रक्षाबंधनापर्यंत राज्यातील बहिणींच्या खात्यात 3 हजार रुपये जमा करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. तसेच आम्ही महिलांसाठी योजना आणली म्हणून विरोधकांनी टीका केली, परंतु आम्ही पुरुषांकडेही दुर्लक्ष करणार नाही. भाव कमी असल्याने आम्ही दूध उत्पादक शेतकऱ्यांना 5 रुपयांचं अनुदान देतोय म्हणजे आम्ही भावांसाठीही निर्णय घेतो आहे, असे अजित पवारांनी यावेळी सांगितले. 
 
 आपल्याला लोकसभा निवडणुकीत अपयश आलं, पण कुणीही खचून जायचं नाही. अपयश पचवता आलं पाहिजे. विधानपरिषद निवडणुकीत आपल्याला यश मिळालंय. विजयानं कुणीही हुरळून जायचं नाही. अपयश आलं तरी खचून न जाता नव्या उमेदीने जनतेसमोर जाण्याची तयारी केली पाहिजे,असा कानमंत्र अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला. त्याचसोबत विधानसभा निवडणुकीसाठी आपल्याला प्रत्येक तालुका, जिल्हा ढवळून काढायचा आहे. हे कुणाचं घरचं काम नाही, कुणीही कमी पडायचं नाही. सर्वांनी दिलेली जबाबदारी पार पाडायची आहे, अशा सूचना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Vidhan Parishad Election : "माझी पक्षातून हकालपट्टी करा, पण आधी...", आमदार खोसकर संतापले

अजित पवार पुढे म्हणाले की, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांनी काम करत असताना कुठल्याही जात, धर्मातील नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही. सत्ता येते, सत्ता जाते, आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाही. पण कृपा करा पण खोट्या नरेटिव्हवर विश्वास ठेऊ नका. तसेच येणाऱ्या अर्थसंकल्पात राज्यातील सर्व जातीधर्मातील मुलींचं सगळं शिक्षण मोफत करणार आहोत, प्रत्येक योजनेसाठी निधी बाजूला काढून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. फक्त मुलीच नाही तर मुलांकडेही आमचं लक्ष आहे. 10 लाख मुलामुलींना 10 हजारांपर्यंतचं स्टायपेंड देऊ, असे देखील अजित पवारांनी यावेळी सांगितले. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT