Manoj Jarange: ‘अरेरे तुम्ही काय गप्प बसू नका..’, जरांगेंची धनगर समाजाला हाक

रोहित गोळे

ADVERTISEMENT

manoj jarange patil leader of the maratha community suggested that dhangar community should unite for reservation
manoj jarange patil leader of the maratha community suggested that dhangar community should unite for reservation
social share
google news

Manoj Jarange: अहमदनगर: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा मोर्चाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) हे आज (24 ऑक्टोबर) थेट धनगर समाजाच्या (Dhangar Reservation) दसरा मेळाव्यात सहभागी झाली. मराठा समाजाप्रमाणेच धनगर समाजाने देखील एकजुटीने सरकारला धारेवर धरणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही देखील अजिबात गप्प बसू नका.. असं म्हणज मनोज जरांगे यांनी धनगर समाजाला देखील चुचकारलं आहे, अहमदनगरमध्ये आयोजित धनगर समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. (manoj jarange patil leader of the maratha community suggested that dhangar community should unite for reservation)

ADVERTISEMENT

पाहा मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले:

‘आपल्या दोघांचं (मराठा आणि धनगर समाजाचं) दु:ख एकच आहे. ते सरकार आलं की, पडलेलं म्हणतं की, मी आलो की लगेच आरक्षण देतो. ते पडलेलं निवडून आलं की म्हणतं की चारच दिवसात आरक्षण देतो. अरे तुमची सत्ता येते कधी आणि आम्हाला घुमवता किती.. ही जागरुता आपल्यात येणं गरजेचं आहे.’

हे ही वाचा >> ‘गोपीनाथ मुंडे स्मारक आता बनवू नका’; पंकजा मुंडे भडकल्या, मेळाव्यातून भाजपवर तोफ

‘घराघरातल्या मराठ्यांनी आरक्षणासाठी जशी कंबर कसली. तशी तुम्हाला धनगरांच्या शेवटच्या माणसापर्यंत आरक्षण सांगावं लागेल. जर धनगरांची लाट उसळली तर ती कोणू रोखूच शकत नाही.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘आता आमचा शेवटचा दिवस आहे.. संधाकाळपर्यंत आहे आशा.. झाले जागे तर झाले.. पळतात ते विमानं घेऊन सध्या. त्यांनी इतके डाव टाकले पण आपण त्यांचे सगळे डाव उधळले.’

‘मी मागे प्रश्न विचारला होता की, विदर्भातील मराठ्यांना आरक्षण का म्हणून दिलं? ते म्हणाले की, त्यांचा व्यवसाय शेती आहे. मग मी म्हटलं आमच्याकडे काय समुद्र आहे का? आम्ही काय होड्या हाणतो काय? धनगर बांधवांचा व्यवसाय काय तर शेती.. आणि तुम्ही घटनेत असून तुम्हाला आरक्षण कसं नाही? मला प्रश्नच पडलाय.’

ADVERTISEMENT

‘अरेरेरे.. तुम्हाला काही तरी डोकं लावावं लागेल हा सामान्य धनगर बांधवाला.. तुम्ही काय गप्प बसू नका… नाही तर असे घुमवतात ना.. तुम्हाला जर तुमच्या लेकरा-बाळाचं चांगलं करायचं ना तर तुम्हालाच पेटून उठायला लागणार..’

‘घटनेने तुम्हाला धनगड नसता धनगर म्हणून आहेत.. मग तर लय दणक्यात आरक्षण मिळाला पाहिजे तुम्हाला..’

हे ही वाचा >> ड्रग्ज प्रकरणावरून पंकजा मुंडेंनी फडणवीसांना सुनावलं, म्हणाल्या…

‘राजकारण डोक्यात ठेवून तुम्ही काही केलं तर तुम्हाला आरक्षणच मिळणार नाही. मला माझ्या समाजाशी गद्दारी करायची संधी होती. माझ्याजवळं संपूर्ण मंत्रिमंडळ बसलं होतं 17 दिवस.. मला माझ्या समाजाशी दगाफटका करायचा असता तर करू शकलो असतो. पण मी माझ्या जातीशी प्रामाणिक आहे.’ असं म्हणत जरांगे पाटील यांनी धनगर समाजाला चुचकारण्याचं काम केलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT