MLA Disqualification: ‘नार्वेकर वर्षा बंगल्यावर सेटलमेंट…’, आदित्य ठाकरेंचा खळबळजनक आरोप

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mla disqualification case aditya thackeray criticize vidhan sabha speaker rahul narwekar cm eknath shinde maharashtra politics
mla disqualification case aditya thackeray criticize vidhan sabha speaker rahul narwekar cm eknath shinde maharashtra politics
social share
google news

Aditya Thackeray criticize Rahul Narwekar : आमदार अपात्रता प्रकरणार उद्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहे. या निकालाआधीच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहेत.त्यातच निकालाआधी विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर घेतलेली भेट वादात सापडली आहे. कारण विरोधकांनी या भेटीवरून त्यांना लक्ष्य करायला सुरूवात केली आहे. त्यात आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) वर्षा बंगल्यावर सेटलमेंट करायला गेल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे आमदार अपात्रता निकालावरून राजकारण आणखीणच तापण्याची शक्यता आहे. (mla disqualification case aditya thackeray criticize vidhan sabha speaker rahul narwekar cm eknath shinde maharashtra politics)

ADVERTISEMENT

आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध मुद्यावर प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा अध्यक्ष स्वत: मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जातात, एक तर घटनाबाह्य मुख्यमंत्री. न्यायमुर्ती आरोपींच्य़ा भेटीला जातात असे मी कुठेच ऐकले नव्हते. त्यामुळे वर्षा बंगल्यावर सेटलमेंट करायला अध्यक्ष महोदय गेले असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर केली आहे. तसेच न्यायमुर्ती असताना तुम्ही असे करू शकत नाही, असे देखील आदित्य ठाकरेंनी ठणकावून सांगितले.

हे ही वाचा : Viral News: भलताच पुरूष होता 4 मुलींचा बाप, 16 वर्षानंतर पतीला समजलं पत्नी तर…

आमदार अपात्रतेच्या निकालावर आदित्य ठाकरे म्हणाले की, संविधानाप्रमाणे गेले तर शिंदेसह 40 आमदार हे बाद होतात. पण भाजपला जे संविधान लिहायचंय आणि बाबासाहेब आंबेडकरांच संविधान बदलायचेय, त्या संविधानाप्रमाणे आम्ही गेलो तर आम्ही बाद होऊ असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीने छापा टाकल्याच्या प्रकरणावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ईडी, सीबीआय, आयटी हे एनडीएचे घटकपक्ष झाले आहेत. जे सत्या सोबत उभे राहतात, सत्याच्या विऱोधात जातात, त्यांच्यावर दबाव टाकला जातो, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले.

हे ही वाचा : आधी Love Marriage केलं, नंतर ‘तो’ आयुष्यात आला अन्…; हत्येची Inside Story

गद्दारांनी यावर विचार करावा. त्यांचे राजकीय करिअर संपवून, दोन पक्ष फोडून आणि मग परिवार फोडून काय मिळवलं या भाजपाने हा प्रश्न पडतोच ना, असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT