Shambhuraj DesaI : शिंदेंच्या मंत्र्याचा राऊतांना दम, 'अजून निर्दोष मुक्तता नाही जामिनावर...'
संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचे गुंडाबरोबरच फोटो शेअर केल्यानंतर आता मंत्री शंभूराज देसाईंनी राऊतांवर टीका केली आहे. राऊतांना दम देत ते त्यांना म्हणाले की, 'तुम्ही अजून निर्दोष नाही तर जामिनावर बाहेर आहात हे लक्षात ठेवा' असा दमच त्यांनी त्यांना दिला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
'राऊत अजून तुमची निर्दोष मुक्तता नाही'
'मुख्यमंत्र्यांची कॅबिनेट अंडरवर्ल्डची गँग चालवते'
'राऊत तुम्ही फक्त जामिनावर बाहेर आहात'
Sanjay Raut : भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हिल लाइन पोलीस ठाण्यात गोळीबार केल्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. हे प्रकरण ताजे असतानाच मॉरिसने ठाकरे गटाचे माजी नगरसेवकर अभिषेक घोसाळकरवर (Abhishek ghosalkar) फेसबूक लाईव्ह (Facebook Live) चालू असताना गोळीबार करून घोसाळकरांची हत्या केली तर स्वतःही आत्महत्या केली. या दोन्ही घटनामुळे राज्य सरकारवर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल केला गेला. खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी तर मुख्यमंत्र्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत मुख्यमंत्र्यांची कॅबिनेट अंडरवर्ल्डची गँग चालवत असल्याचा आरोप केला गेला.
ADVERTISEMENT
निर्दोष मुक्तता नाही
खासदार संजय राऊत यांच्याकडून राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडत असल्याचा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यामुळे आता शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्यावर पलटवार करत तुमची अजून निर्दोष मुक्तता झाली नाही, तुम्ही जामिनावर बाहेर आहात लक्षात ठेवा अशी थेट त्यांनी राऊतांना तंबीच दिली आहे.
हे ही वाचा >> मोहोळच्या पत्नीला धमकी देणारा ससूनमधून पळाला
गुन्हेगारांचे फोटो शेअर
गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुन्हेगारांचे असलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. फोटो शेअर करत असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोपही केले आहेत.
हे वाचलं का?
फक्त जामिनावर बाहेर
संजय राऊत म्हणाले की, 'मुख्यमंत्र्यांची कॅबिनेट अंडरवर्ल्डची गँग चालवत आहे.' त्यांच्या या टीकेवरून शंभूराज देसाई यांनी त्यांना थेट दम देत, 'संजय राऊत तुमची अजून निर्दोष मुक्तता झाली नसून ते फक्त जामिनावर बाहेर असल्याचे त्यांनी लक्षात ठेवावे' अशी थेट तंबीच दिल्याने हा वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोणतं पुण्यकर्म
मंत्री शंभूराज देसाई यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना खासदार संजय राऊत तुम्ही कोणत्या पुण्यकर्मासाठी 100 दिवस तुरुंगात जाऊन आला आहात असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे त्यांची अजून निर्दोष मुक्तता झाली नसून ते जामिनावर बाहेर असल्याचे त्यांनी लक्षात ठेवावे असा इशाराच त्यांनी त्यांना दिला आहे.
ADVERTISEMENT
कॅबिनेट अंडरवर्ल्डची गॅंग
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गुन्हेगारांचे असलेले फोटो संजय राऊत यांच्याकडून ट्वीट केले जात असून मुख्यमंत्र्यांची कॅबिनेट अंडरवर्ल्डची गॅंग चालवत असल्याचा आरोप केला आहे. या आरोपाला सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर देताना संजय राऊतांना चागला दमच दिला आहे. संजय राऊत कोणत्या पुण्यकर्मासाठी 100 दिवस तुरूंगात जावून आले आहेत. त्यांची अजून निर्दोष मुक्तता झाली नसून ते जामिनावार बाहेर असल्याचे त्यांनी लक्षात ठेवाव, असे मंत्री देसाई म्हणालेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> 'घराणेशाहीपेक्षा एकाधिकारशाही घातक',ठाकरेंचा मोदींवर घणाघात
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT