Nanded : आधी ठाण्यात, आता नांदेडला ‘मिंधे सरकार’…,नांदेड मृत्यू प्रकरणात ठाकरेंचा संताप

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

nanded incident aditya thackeray jayant patil reaction government hospital 24 death 12 newborn die
nanded incident aditya thackeray jayant patil reaction government hospital 24 death 12 newborn die
social share
google news

नांदेडच्या शासकीय रूग्णालयात गेल्या 24 तासात 24 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. गंभीर बाब म्हणजे, यात 12 नवजात बालकांचा समावेश आहे.डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयात हा प्रकार घडला आहे. रूग्णालयातील हा प्रकार उघडकीस येताच राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवरून राजकीय वातावरण देखील तापले आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणात संताप व्यक्त करत शिंदे सरकारवर टीका केली आहे. (nanded incident aditya thackeray jayant patil reaction government hospital 24 death 12 newborn die)

ADVERTISEMENT

आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत नांदेड दुर्घटनेवर संताप व्यक्त केला आहे. ठाण्यात हेच झालं, आता नांदेडला झालं… दिरंगाई, दुर्लक्ष आणि बेदरकारपणामुळे वारंवार महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवाशी खेळ सुरु आहे,अजून कितीदा पुन्हा पुन्हा हेच घडू देणार? असा सवाल ठाकरेंनी केला.

हे ही वाचा : MNS: मनसेचं पुन्हा खळ्ळखट्याक, परप्रांतीयांना बेदम चोपलं; नेमकं काय घडलं?

वेळेवर औषध पुरवठा न झाल्याने रुग्णांना जीव गमवावा लागला असं समजतंय. हाफकिनने औषध खरेदी बंद केल्यामुळेच राज्यभरात सरकारी रुग्णालयात औषधांचा तुटवडा भासत आहे. मुंबईत देखील अनेक सरकारी आणि महानगरपालिका रुग्णालयांमधे औषधांची हीच परिस्थिती आहे आणि त्याचे परिणाम राज्यभरातल्या निष्पाप जनतेला भोगावे लागत आहेत.आम्ही ह्या विरुद्ध आवाज उठवला होता, पत्र लिहिलं होतं, KEM रुग्णालयावर मोर्चाही काढला होता. पण मिंधे सरकार ढिम्मच राहिलं, अशी टीका आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे मातांनी लेकरे गमावली

.ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी प्रकारानंतर नांदेडहून येणारी बातमी वेदनादायी असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला. रुग्णांना वेळेवर औषधे पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला अशी प्राथमिक माहिती मिळते असल्याचे देखील जयंत पाटील यांनी सांगितले. जितकी कार्यक्षमता स्वतःच्या प्रचारासाठी, विरोधी पक्ष फोडण्यासाठी वापरता, तितकी कार्यक्षमता जर कामाप्रती दाखवली असती तर ही परिस्थिती आली नसती. सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे आज अनेक मातांनी आपली लेकरे गमावली आहेत. त्यांच्या अश्रूंची किंमत सरकारला मोजावी लागेल, अशी टीका जयंत पाटील यांनी सरकारवर केली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Virar Story: सकाळी बकरी चारायला गेला, परतला तेव्हा करोडपती होऊनच आला!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT