Narendra Modi: चार भाऊ आणि एक बहीण, कसा आहे मोदींचा परिवार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

narendra modi
narendra modi
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मोदींचे चार भाऊ, एकुलती एक बहीण नेमकं करतात काय?

point

मोदींचं खरं कुटुंब आहे कुठं आणि करतं काय?

PM Narendra Modi: लोकसभा निवडणुकीचा (Lok sabha Election 2024) अजून कोणताही दिवस निश्चित झाला नाही, मात्र त्याआधीच राजकीय वाद उफाळून आले आहेत. त्यातच भाजपने सोमवारपासून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आताच्या प्रचाराला नव्याने सुरुवात झाली आहे. या प्रचारामुळे आता अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजप (BJP) नेत्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरील बायोमध्ये बदल केला आहे. तर काही नेत्यांनी आपल्या नावापुढं आता 'मोदी का परिवार' असं वाक्य जोडले आहेत.

ADVERTISEMENT

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक टीका केली होती, त्यावेळेपासून त्यांनी हे कम्पेन सुरु केले आहे. लालू प्रसाद यादव यांनी पाटण्यातील सभेत बोलताना आणि त्यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटले आहे की, मोदींना कुटुंबच नाही. त्यांच्या त्या वक्तव्याला प्रत्त्युत्तर देताना मोदींनी त्यांना म्हणाले की, 140 कोटी देशवासीय हेच माझे कुटुंब असल्याचा त्यांनी पलटवार केला होता.

मोदी का परिवार

लालू प्रसाद यादवांच्या त्या टीकेनंतर भाजपने सोमवारी ‘मोदी का परिवार’ हे कम्पेन सुरु केले आहे. आतापर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह आणि पक्षाच्या सर्व बड्या नेत्यांनी त्यांच्या एक्स-प्रोफाइलमध्ये त्यांच्या नावापुढे 'मोदींचे कुटुंब' असे शब्द जोडले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भाजपने 'मोदी का परिवार' हे कॅम्पेन सुरु केले असले तरी तुम्हाला हे माहिती आहे का, नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबामध्ये नेमकं कोण कोण सदस्य आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वडील दामोदरदास मूलचंद मोदी यांचे लग्न हीरा बा यांच्याबरोबर झाले होते. त्यांना 6 अपत्य होती. नरेंद्र मोदी हे तिसऱ्या क्रमांकाचे त्यांचे अपत्य. सोमभाई, अमृतभाई, प्रल्हादभाई, वासंतीबेन आणि पंकजभाई ही त्यांची उरलेली मुले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वासंतीबेन या एकुलत्या एक बहीण आहेत.

संवाद फक्त फोनवरूनच

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे भाऊ सोमभाई मोदी, हे सोमभाई वडनगरमध्ये वृद्धाश्रम चालवतात. कारण वडनगर हे मोदी कुटुंबीयांचे वडिलोपार्जित गाव आहे. काही वर्षांपूर्वी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सोमभाई यांनी सांगितले होते की, 'मी नरेंद्र मोदींचा भाऊ आहे पण पंतप्रधान नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मी 125 कोटी देशवासियांपैकीच मी एक आहे. ते हे ही सांगतात की, गेल्या अनेक वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते भेटलेले नाहीत, मात्र कधी तरी त्यांच्यासोबत फोनवरून बोलणं होतं.

ADVERTISEMENT

तर नरेंद्र मोदी यांचे लहान भाऊ पंकजभाई मोदी गुजरातमधील माहिती विभागामध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर पंकजभाईंनी नरेंद्र मोदींची अनेकदा भेट घेतली आहे, कारण त्यांची आई हिराबा या त्यांच्यासोबत राहत होत्या.

ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जन्म चहाचे दुकानदार असलेल्या दामोदरदास मूलचंद मोदी यांच्या घरात झाला होता. 2016 मध्ये एका सभेत पीएम मोदी यांनी सांगितले होते की, 'माझ्याकडे जे काही आहे, माझं कुटुंब, माझं घर हे सगळं देशासाठी सोडून दिलं आहे.'

मोदींचं कुटुंबीय सामान्यच


नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याआधी ते 12 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते, मात्र तरीही त्यांचे कुटुंबीय सामान्य माणसांसारखेच जीवन जगत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आणखी एक मोठे भाऊ म्हणजे अमृतभाई मोदी हे त्यांचा मुलगा संजय, सून आणि दोन नातवंडांसोबत अहमदाबादमध्ये राहतात. ते एका खासगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. मोदींचे मोठे अमृतभाई जेव्हा नोकरी करत होते, तेव्हा त्यांचा पगार अवघा 10,000 रुपयांपेक्षाही कमी होता.

आता ते आपला मुलगा संजय यांच्या घराजवळ छोटे स्पेअर पार्ट्सचे दुकान चालवतात. त्यातूनच ते आपला घरखर्च चालवतात.  त्यांच्या कुटुंबाने 2009 मध्ये त्यांची पहिली कार खरेदी केली होती, मात्र घरी कार असूनही त्यांच्या तया कारवर कव्हर टाकून ती झाकलेली असते. कारण हे कुटुंब सहसा दुचाकी वापरतात.

नरेंद्र मोदींनी घर सोडले तेव्हा


नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गेल्यापासून त्यांनी आपलं सगळं जीवन देशासाठी समर्पित करून टाकले, ते प्रचारक म्हणून काम करू लागले आणि त्यांनी आपलं स्वतःचं घर सोडून दिले. 

नरेंद्र मोदी यांचे भाऊ अमृतभाई सांगतात की, नरेंद्र मोदींना ते शेवटचं 1971 मध्ये भेटले होते. त्याचवेळी नरेंद्र मोदी यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. अमृतभाई सांगतात की, ज्यावेळी नरेंद्र मोदींनी मी घर सोडणार असं सांगितलं, तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले होते, तर नरेंद्र मोदी मात्र शांत आणि स्थिरपणे थांबले होते.

पंतप्रधान मोदींचे धाकटे भाऊ प्रल्हाद मोदी हे अहमदाबादमध्ये रेशन दुकान चालवतात. मात्र त्यांनी रेशनच्या वाढत्या भावाचा मुद्यावरून त्यांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. अगदी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यावेळीही त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.

तर नरेंद्र मोदी यांना एकलुती एक बहीण आहे, त्यांचे नाव वासंतीबेन आहे. वासंतीबेन यांनी हसमुखभाई यांच्याबरोबर लग्न केले. हसमुखभाई एलआयसीमध्ये नोकरी करत होते.

हे ही वाचा >> Amit Shah : शाहांनी शरद पवारांनाच मागितला हिशोब

पंतप्रधान मोदी यांचे काका आणि त्यांचे चुलत भाऊ हेही अगदी सामान्य असच जीवन जगतात. त्यांचे चुलत भाऊ भरतभाई मोदी वडनगरपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका पेट्रोल पंपावर काम करतात.

तर त्यांचे दुसरे चुलत भाऊ अशोकभाई वडनगरच्या घीकांत मार्केटमध्ये पतंग, फटाके आणि फराळ विकतात. त्यांचेही अगदी 8 बाय 4 फुटांचे छोटंसं दुकान आहे, आणि त्याचे भाडे त्यांना 1500 रुपये भरावे लागते, वर त्या दुकानातून त्यांची मिळकत ही 4 हजार रुपये एवढीच आहे. अशोकभाई आणि भरतभाई यांचे भाऊ अरविंदभाई यांचे रद्दीचे दुकान आहे. यातून त्यांना महिन्याला 6 ते 7 हजार रुपये मिळतात.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT