Nilesh Rane Retirement : फडणवीसांची भेट अन् नीलेश राणेंचा निर्णय मागे; कारण…
Nilesh Rane, Devendra Fadnavis and Ravindra chavhan meeting : नीलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर नीलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेतला.
ADVERTISEMENT
Nilesh Rane Latest Marathi News : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपूत्र आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी 24 तासांत राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय मागे घेतला. भाजपचे नेते तथा कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नीलेश राणे यांची भेट घेतली. त्यानंतर नीलेश राणे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीसांनी चर्चा केली. या गाठीभेटींनंतर नीलेश राणे यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. दरम्यान, नीलेश राणेंनी तडकाफडकी घेतलेल्या राजकीय संन्यासामागच्या कारणाचा रवींद्र चव्हाण यांनी खुलासा केला. (Nilesh Rane, Son Of Narayan Rane took back his decision of exit from active politics)
ADVERTISEMENT
‘आता राजकारणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही’, असं म्हणत माजी खासदार नीलेश राणेंनी राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली. पण, भाजप नेत्यांच्या मनधरणीनंतर त्यांनी निर्णय मागे घेतला.
रवींद्र चव्हाणांकडून मनधरणी, फडणवीसांची भेट
नीलेश राणे यांची सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी (२५ ऑक्टोबर) भेट घेतली. त्यानंतर दोघेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर गेले. फडणवीस, नीलेश राणे आणि चव्हाण या तिन्ही नेत्यांची दीर्घ चर्चा झाली. या बैठकीनंतर नीलेश राणे यांनी निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Gadchiroli : 20 दिवस, 5 हत्या! सुनेच्या खुनी खेळाने हादरला महाराष्ट्र, वाचा Inside Story
चव्हाणांनी सांगितले नीलेश राणेंच्या नाराजीचं कारण
फडणवीसांची भेट घेतल्यानंतर नीलेश राणे निघून गेले. त्यानंतर चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना घडलेल्या राजकीय नाट्याबद्दल भाष्य केले. चव्हाण म्हणाले की, “नीलेश राणे यांनी ट्विट केल्यानंतर काय घडले हे आम्हाला माहिती नव्हते. आम्ही नारायण राणेंसोबत चर्चा केली. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. संघटनेत काम करत असताना कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये ही सर्वांची भावना आहे.”
याच मुद्द्यावर पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, “छोट्या कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घ्यायला हव्यात, असं त्यांचं म्हणणं होतं. आम्ही चर्चा केली. नीलेश राणे यांनी रागावून निर्णय घेतला होता. आता मी स्वतः यात लक्ष घालणार आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांची कामे केली जातील. मी आग्रह केला की, असा निर्णय घेऊ नका. अडचणी समजून घेऊ.”
हे ही वाचा >> “…अन् बाबर आझम तिथेच रडत बसला”, पराभवानंतर ड्रेसिंग रुममध्ये काय घडलं?
“आम्ही सगळे पक्षासाठी काम करत आहोत. लोकसभा, विधानसभा निवडणुका लढताना कार्यकर्त्यांना कोणतीही अडचण येऊ नये, याची खबरदारी घेतली जाणार आहे”, असं रवींद्र चव्हाण म्हणाले.
ADVERTISEMENT
नीलेश राणेंच्या राजीनामा अन् काय झाली चर्चा?
माजी खासदार नीलेश राणे यांच्या राजीनाम्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली. त्यांच्या राजीनाम्यामागे स्थानिक राजकारण असल्याचे सांगितले गेले. सत्तेतीलच काही शिवसेनेच्या नेत्यांकडून हस्तक्षेप होत असल्याने ते नाराज झाल्याची म्हटले गेले. दुसरीकडे नीलेश राणे यांना कुडाळ विधानसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा आहे. खुद्द रवींद्र चव्हाण यांनीच त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. पण, या मतदारसंघातील राजकारण डळमळीत आहे. त्या राजकीय अस्थिरतेमुळे नीलेश राणेंनी निर्णय घेतला होता, अशीही चर्चा आता होत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT