‘…तो अपने अंदर झाँक के देख लें’, CM शिंदेंचा शायरीतून विरोधकांवर पलटवार

योगेश पांडे

ADVERTISEMENT

On the first day of the winter session, Chief Minister Eknath Shinde criticized the opposition
On the first day of the winter session, Chief Minister Eknath Shinde criticized the opposition
social share
google news

CM Eknath Shinde : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार (Boycott of opponents) टाकत सरकारवर गंभीर आरोप केल्यामुळे त्यांच्या आरोपालाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर पलटवार करताना विरोधकांनी दिलेल्या पत्रांवरूनही त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पत्रावर 23 जणांची नावं आहेत, तर सह्या मात्र 7 जणांनीच केल्यामुळे त्यांनी टीका करताना आधी स्वतःकडे पाहावे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

ADVERTISEMENT

नैतिक अधिकार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका करताना खास शायरीतून त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. मुंह खोलने से पहले सोचना सीख लें, पहले तो अपने अंदर झाँक के देख लें म्हणत त्यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला आहे. आधी विरोधकांनी आपण आरशात पाहावं असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे. कारण ज्यांच्या कार्यकाळात नागपूरमध्ये एकही अधिवेशन ज्यांनी अधिवेशन घेतले नाही. त्यांना आमच्या टीका करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. आमचे सरकार हे सर्वसामान्यांचे आहे, शेतकऱ्यांचे आहे. मात्र ज्यांना ना शेतकऱ्यांचविषयी निर्णय घेता आले ना सर्वसामान्यांविषयी त्यांनी कोणत्या आधारावर आमच्यावर टीका करतात असा सवालही त्यांनी केला.

हे ही वाचा >> Solapur : शिक्षणाधिकाऱ्याच्या घरात सापडलं तब्बल 6 कोटींचं घबाड, कुठून आली ‘इतकी’ संपत्ती?

जे कधीच घराबाहेर पडले नाहीत

हिवाळी अधिवेशनाच्यानिमित्ताने विरोधकांकडून चहापानावर बहिष्कार घातला जातो आहे. मुळात अधिवेशनातून आमच्याकडून शेतकऱ्यांचे, जनसामान्यांचे आणि महिलांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. मात्र जे कधी घराच्या बाहेर निघाले नाहीत ते आता शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याच्या बाता करत आहे असल्याचे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

हे वाचलं का?

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अनेक मुद्यांना हात घालत त्यांनी मराठा आरक्षणाबद्दलही त्यांनी विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही त्यांनी बोट ठेवत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीर पणे उभे राहणार असल्याचाही त्यांनी विश्वास व्यक्त केला.

ओबीसींवर अन्याय होणार नाही

यावेळी त्यांनी हेही सांगितले की, सरकारची भूमिका प्रामाणिक आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीं किंवा इतर कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नसल्याचेही त्यांनी सांगितेल. तसेच आम्ही ओबीसी समाजाचीही बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याचे अश्वासन दिले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मराठा आरक्षण देण्याचं काम सरकार करणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी दिला आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> डॉक्टरने पत्नी, मुलांचं डोकं हातोड्यानं ठेचलं, सगळं कुटुंबच क्रूरपणे का संपवलं?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT