Narendra Modi शपथ घ्यायला येताच राहुल गांधींनी टाकला मोठा डाव, लोकसभेत काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

parliament session update pm narendra modi takes oath rahul gandhi shows constitution congress share video
18 व्या लोकसभेच्या पहिल्याच अधिवेशनाला आजपासून सूरूवात झाली आहे.
social share
google news

PM Narendra Modi Oath : 18 व्या लोकसभेच्या पहिल्याच अधिवेशनाला आजपासून सूरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत खासदारांना खासदारकीची शपथ दिली जात आहे. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) खासदारकीची शपथ घेतली, तेव्हा खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संविधानाची प्रत दाखवल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ काँग्रेसने शेअर केला आहे. (parliament session update pm narendra modi takes oath rahul gandhi shows constitution congress share video)

व्हिडिओत काय?

खासदारांचा शपथविधी सुरु झाल्यानंतर लोकसभेच्या हंगामी अध्यक्षांनी नरेंद्र मोदींना शपथ घेण्यासाठी पाचारण केलं. यावेळी मोदी त्यांच्या बाकावरून उठून मंचाकडे शपथ घ्यायला जात असताना राहुल गांधी यांनी हात उंचावून संविधानाची प्रत दाखवली. यावेळी राहुल गांधी पाठोपाठ इतर खासदारांनी देखील हात उंचावून संविधानाची प्रत दाखवली होती. शपथविधी दरम्यान संसदेत हा सगळा राडा झाला होता.

काँग्रेसने त्यांच्या एक्स अंकाऊंटवर या संदर्भातला व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला इंडिया आघाडी जीवाची बाजी लावत संविधानाची रक्षा करेल असे कॅप्शन लिहण्यात आले आहे. या संदर्भातला व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 मोदींनंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील लोकसभा खासदारांनी शपथ घेतली. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे नाव शपथेसाठी घेतले असता, तेव्हा विरोधकांनी NEET-NEET, शेम शेम असे म्हणण्यास सुरुवात केली. पेपर हेराफेरीप्रकरणी विरोधकांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

दरम्यान 18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. प्रोटेम स्पीकर आणि नीट पेपर लीक प्रकरणी विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. या सगळ्यात अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष 'इंडिया' आघाडीच्या खासदारांनी संविधानाची प्रत घेऊन संसदेबाहेर मोर्चा काढला. यानंतर सर्व विरोधी खासदार संविधानाची प्रत घेऊन सभागृहात पोहोचले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT