Raj Thackeray: "तुम्ही फुकटचे पैसे..."; लाडकी बहीण योजनेबाबत राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray On Ladaki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केलीय. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात या योजनेचा गाजावाजा झाला. परंतु, विरोधकांकडून या योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारवर सातत्याने टीका-टीपण्णी केली जात आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
"महाराष्ट्रात असंख्य नोकऱ्या आहेत, पण..."
लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी अजित पवारांची उडवली खिल्ली
पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी शरद पवारांचाही घेतला समाचार
Raj Thackeray On Ladaki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केलीय. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात या योजनेचा गाजावाजा झाला. परंतु, विरोधकांकडून या योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारवर सातत्याने टीका-टीपण्णी केली जात आहे.
अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलं आहे. लाडकी बहीण योजना सुरु आहे, तुमचं सरकार आल्यावर तुमची भूमिका काय असणार? यावर प्रतिक्रिया देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, तुम्ही (सरकार) लोकांना अशाप्रकारे ढीले करून चालणार नाही. लोकांना कामाला लावा. लोकं काम मागत आहेत, फुकटचे पैसे मागत नाहीत. (The state government has announced that women will get Rs. 1500 per month through the Chief Minister's Ladki Bahin Yojana. After that, this scheme became popular all over Maharashtra)
"महाराष्ट्रात असंख्य नोकऱ्या आहेत, पण..."
राज ठाकरे पुढे म्हणाले, शेतकरी फुकटची वीज मागत नाही. त्या वीजेत खंड नको, एव्हढच तो मागतोय. तुम्ही पहिल्यांदा या लोकांच्या मागण्या समजून घ्या. तुम्हाला मतं हवीत, म्हणून तुम्ही वाटेत ते फ्री देता. फ्री म्हणजे कुणाचं आहे ते, ते लोकांचं आहे. आता जे पैसे दिले जात आहेत, तो लोकांचा टॅक्स आहे. तुम्हाला असं करून चालणार नाही. महाराष्ट्रात असंख्य नोकऱ्या आहेत. महाराष्ट्राच्या पोरांना नोकऱ्या करायच्या आहेत. पण ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. बाहेरच्या राज्यात कळतं आमच्याकडे टॅक्सी आणि रिक्षांचे परवाने दिले जातात आणि महाराष्ट्रात कळत नाही. ही कोणती पद्धत आहे? असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Maharashtra Bandh : "नराधमाला पाठिशी घालणारं विकृत सरकार..."; भर पावसात उद्धव ठाकरे संतापले
राज ठाकरेंनी अजित पवारांची उडवली खिल्ली
लाडकी बहीण मध्य प्रदेशचं मॉडेल डोळ्यासमोर ठेऊन आली आहे, यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, त्याला एकच कारण नसतं. मध्यप्रदेशमध्ये यश मिळालं ते फक्त लाडक्या बहिणी योजनेमुळं नसलं मिळालं. त्याला अनेक कारणं असतील, ती पण तपासली पाहिजेत. हे सर्व यश आणायचं आणि एका योजनेवर टाकायचं, असं थोडीच असतं. मला असं वाटतं हा पहिला महिना जाईल. कदाचित दुसरा महिना जाईल. सरकारकडे पैसे कुठे आहेत? यामध्ये अजितदादाही म्हणाले, निवडून दिलं तरच पुढचं...सरकारकडे पैसे पाहिजेत ना, असं म्हणत राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची खिल्ली उडवली.
हे ही वाचा >> IMD Rain Alert : महाराष्ट्रात 'या' शहरात कोसळणार पावसाच्या सरी? पावसाची आजची स्थिती जाणून घ्या
पुरोगामी महाराष्ट्राचा उलटा प्रवास सुरु झाला का? असं वाटतं का तुम्हाला? यावर बोलताना ठाकरे म्हणाले, निश्चित. पहिली गोष्ट म्हणजे फोडाफोडीचं राजकारण. या सर्व गोष्टींना कारणीभूत फक्त शरद पवार आहेत. कारण या शरद पवारांनी या गोष्टींची सुरुवात महाराष्ट्रात केली. १९७८ ला पुलोद स्थापन होऊन सरकार येणं. त्यानंतर १९९१ ला त्यांनी शिवसेनेचे आमदार (छगन भुजबळ) फोडले. पुन्हा फोडाफोडीचं राजकारण केलं. त्यानंतर गणेश नाईक, नारायण राणे गेले. हे सगळं राजकारण शरद पवारांनी महाराष्ट्रात सुरु केलं. त्यानंतर जातीचं विषही त्यांनीच कालवलं, असं म्हणत राज ठाकरेंनी शरद पवारांवर घणाघात केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT