Ram Satpute : मोहितेंचा माज, जी भाषा समजेल त्या भाषेत उत्तर देऊ... आव्हान स्वीकारत काय म्हणाले सातपुते?

मुंबई तक

सोलापुरातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावाला शरद पवार यांनी भेट दिली, या कार्यक्रमाच्या आधी भाजप समर्थकांनी लावलेले फलक झाकण्यावरुन थोडा तणाव निर्माण झाला होता. यावेळी दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यावरुन राम सातपुते यांनी आक्रमक पवित्रा घेत शरद पवार आणि मोहितेंना उत्तर दिलं.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शरद पवार, मोहिते, जानकरांना सातपुतेंचे उत्तर

point

"जानकरांनी राजीनाम द्यावा, मी निवडणूक लढयला तयार"

point

मोहितेंना जशास तसं उत्तर देण्याचा इशारा

Ram Satpute on Markadwadi : मोहिते पाटलांच्या गावगुंडांनी आज मारकडवाडीच्या नागरिकांना धमकावलं असा आरोप राम सातपुते यांनी केला आहे. यावरुन त्यांनी मोहितेंना ज्या भाषेत समजेल, त्या भाषेत उत्तर देऊ असं राम सातपुते म्हणाले आहेत. आज मारकडवाडीला शरद पवार यांनी भेट दिली, या कार्यक्रमाच्या आधी भाजप समर्थकांनी लावलेले फलक झाकण्यावरुन थोडा तणाव निर्माण झाला होता. यावेळी दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यावरुन राम सातपुते यांनी आक्रमक पवित्रा घेत शरद पवार आणि मोहितेंना उत्तर दिलं.

 

हे ही वाचा >>Uttamrao Jankar Markadwadi : मी आमदारकीचा राजीनामा देतो, फक्त एकच अट... पवारांसमोर मारकडवाडीत जानकरांचा एल्गार

 

सोलापुरातील माळशिरस मतदारसंघात असणाऱ्या मारकडवाडी गावाने बॅलेटने मतदान घेण्याची मागणी करत एक लढा पुकारला असून, त्याला समर्थन म्हणून शरद पवार यांनी आज या गावाला भेट दिली. या भेटीदरम्यान विजयसिंह मोहिते, जयंत पाटील, खासदार धैर्यशीर मोहिते,  आमदार उत्तमराव जानकर, विद्या चव्हाण यांच्यासह अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उत्तमराव जानकर यांनी पुन्हा एकदा आपण राजीनामा देऊन बॅलेटवर निवडणूक लढण्यास तयार आहोत असा म्हणत राजीनामा देण्याचा इशारा दिला. यावरुन राम सातपुते यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. पवार साहेबांनी सुप्रियाताईंना राजीनामा द्यायला सांगावा, तिथेही बॅलेटने निवडणूक घ्यावी, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असा इशाराही राम सातपुते यांनी दिला. 


हे ही वाचा >>CM Devendra Fadnavis : "...म्हणून सर्वात जास्त मराठा आमदार भाजपमधून झाले", फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं


शरद पवार मारकडवाडीमध्ये आले असताना, मोहितेंच्या गावगुंडांनी, कारखान्याचे कामगार घेऊन जात मारकडवाडीच्या ग्रामस्थांना धमक्या दिल्या. जिंकले तर लोकशाही जिंकली म्हणायचं आणि हारले तर EVM मुळे हारले असं म्हणण्याचा प्रकार पवारांकडून होत आला आहे. तसंच मोहिते पाटलांशी संघर्ष करायला आम्ही तयार आहे असं सातपुते म्हणाले. कधीही निवडणूक लागू करण्याची तयारी दाखवावी, प्रशासनाने जर निवडणूक आयोजित केली, तर आम्ही जशी म्हणाल तशी निवडणूक लढायला तयार आहे असं राम सातपुते म्हणाले. उत्तम जानकरांनी राजीनामा द्यावा, मी त्यांनी दिलेलं आव्हान स्वीकारतो, ते म्हणाले हात वर करुन जरी निवडणूक घ्यायची असेल तरी मी तयार आहे असं सातपुते म्हणाले. उत्तम जानकर हा प्यादा असून, रणजितसिंह मोहिते खरे मास्टरमाईंड आहेत असं राम सातपुते म्हणाले. मारकडवाडीमध्ये आम्ही मोठी सभा करू, माळशिरस मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करण्यासाठी मोठी सभा घेऊ असं राम सातपुते म्हणाले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp