राजकीय नसबंदी…,भाजपचे पाळलेले पोपट, संजय राऊतांची मनसेवर टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sanjay Raut criticize Mns Raj Thackeray
Sanjay Raut criticize Mns Raj Thackeray
social share
google news

Sanjay Raut criticize Mns Raj Thackeray : आम्ही जे बोलतोय, ते सत्य आहे, परखड आणि प्रखर आहे. ते ऐकण्याची आणि सहन करण्याची तुमची किंमत नाही. तुमची राजकीय नसबंदी झालीय, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे (RaJ Thackeray)यांच्यावर केली आहे. संजय राऊत जळगावात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मनसेवर टीकेचे बाण सोडत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवरही भाष्य केले. (sanjay raut criticize mns leaders are bjp parrot raj thackeray)

ADVERTISEMENT

संजय राऊंतांच्या (Sanjay Raut) पत्रकार परिषदेवर अनेकांना आक्षेप आहेत, त्यांच्या जीभेवर नसबंदी करावी अशी टीका मनसे नेत्याने केली होती. यावर राऊत यांनी आता मनसेला प्रत्युत्तर दिलेय. मग करा ना,तुमची राजकीय नसबंदी झालीय,अशी टीका त्यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे (RaJ Thackeray)यांच्यावर केली. मी तुम्हाला आमंत्रित केले आहे का? लोक प्रेमाणे येतात, मी रोज कोणाला आमंत्रण देत नाही,असे देखील ते पत्रकारांना म्हणाले.

आम्ही जो बोलतोय ते सत्य आहे, परखड आहे, प्रखर आहे, ते ऐकण्याची आणि सहन करण्याची तुमची किंमत नाही.त्यामुळे आमच्या पत्रकार परिषदेची भिती आणि पोटसुळ असल्याचीही टीका त्यांनी मनसेवर केली. मनसे नेते भाजपच्या पाळलेल्या पिजऱ्यातले पोपट आहेत, म्हणून ते भाजपचे पोपट म्हणून काम करतात, अशी टीका देखील संजय राऊत (Sanjay Raut)यांनी केली. आमच्या साऱखे जंगलात उघडपणे फिरणारे वाघाची औलाद नाही आहेत. आम्ही आहोत, आम्ही बोलणार, आम्ही गर्जना करणार, आम्ही संघर्ष करणार, तुमच्यात हिम्मत आहे का लढण्याची? तुम्ही मांडलीक आहात, गुलाम आहात सगळे, अशा शब्दात देखील राऊत यांनी मनसेवर टीकेचे बाण सोडले.

हे वाचलं का?

मुखमंत्र्यांना लगावला टोला

राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सकाळ माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत, मला 100 टक्के मुख्यमंत्री व्हायला आवडेल, अशी इच्छा व्यक्त केली होती. अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर देखील संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवारांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. ते अनेक वर्षापासून राजकारणात असून मंत्रीही होते. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम अजित पवारांनी केला आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपण मुख्यमंत्री व्हावं.काही लोक जुगाड करून लायकी नसताना मुख्यमंत्री होतात, असा टोला
संजय राऊंत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT