Sanjay Raut House Reiki: संजय राऊत यांच्या घराची रेकी नाही, 'ते' दोघं कोण होते पोलिसांनी सांगितलं...
संजय राऊत यांचा भाऊ सुनील यांनी याबद्दल पोलिसांत तक्रारही केली आहे. तक्रार दाखल केल्यानंतर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. या तपासात आता एक वेगळीच गोष्ट समोर आली आहे.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या घराची रेकी केल्याचं एक प्रकरण समोर आलं होतं. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या घराची रेकी केल्याचा दावा राऊत यांच्या कुटुंबीयांनी केला होता. दोन्ही दुचाकीस्वारांनी हेल्मेट आणि मास्क घातलेले होते. या प्रकरणात एक सीसीटीव्ही सुद्धा समोर आलं आहे. 'मुंबईतील भांडूपमध्ये असलेल्या घरासमोर 20 डिसेंबर सकाळी हेल्मेट आणि मास्क घातलेल्या दोन दुचाकीस्वारांनी घराचे फोटो काढले' असा आरोप संजय राऊत यांच्या कुटुंबीयांनी केला होता. या प्रकरणात आता एक खुलासा झाला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Mohan Bhagwat : "सत्ता हवी होती तेव्हा मंदिरावर बोलले, सत्ता आल्यावर...", मोहन भागवत यांच्या भूमिकेला 2 मोठ्या महंतांचा विरोध
संजय राऊत यांचा भाऊ सुनील यांनी याबद्दल पोलिसांत तक्रारही केली आहे. तक्रार दाखल केल्यानंतर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. या तपासात आता एक वेगळीच गोष्ट समोर आली आहे. संजय राऊत यांच्या घराच्या कथित रेकी प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठा खुलासा केला असून, राऊतांच्या घराची रेकी झाली नसल्याचं समोर आलं आहे. व्हिडीओत दिसणाऱ्या चार जणांबद्दल तपास केला असता, संजय राऊत यांच्या घरी कोणीही रेकी केली नसल्याचे पोलिसांना आढळून आलं. तर ते 4 जण सेलप्लॅन आणि इन्स्टा आयसीटी सोल्यूशन कंपनीचे कर्मचारी असल्याचं आढळून आले. हे लोक मोबाईल नेटवर्क चेक करत होते.
तक्रार आल्यानंतर मुंबई पोलिसांनी संपूर्ण परिसराचं फुटेज स्कॅन केलं. तसेच जवळच्या लोकांची चौकशी केली. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला नसला तरी पोलिसांनी संजय राऊत यांच्या बंगल्याची सुरक्षा वाढवली आहे.
हे ही वाचा >> Pune Dumper Accident : पुण्यातील वाघोलीमध्ये मध्यरात्री भीषण अपघात, फूटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडलं
दरम्यान, या प्रकरणावरून संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते, हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. माझ्या दिल्लीतील घराचीही वारंवार रेकी करण्यात आली आहे. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT