‘संजय राऊत पिंजऱ्यातला पोपट, मालक आला की…’ रावसाहेब दानवेंनी उडवली खिल्ली
Raosaheb Danave : मराठा आरक्षणावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली असली तरी मनोज जरांगे पाटील यांच्यावबरोबर मात्र आमची बोलणी सुरु आहेत. संजय राऊत टीका करतात मात्र त्यांचे बोलणे हे पिंजऱ्यातील पोपटासारखे आहे. मालक दिसला की, टिव टिव करायचं तसे ते करतात.
ADVERTISEMENT
Raosaheb Danve : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारसह केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला होता. राज्य सरकारवर टीका करताना संजय राऊत (Mp Sanjay Raut) यांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन सरकारवर गंभीर आरोपही केले होते. त्यावरून आता राजकारण तापले आहे. संजय राऊत यांनी राज्य आणि केंद्रावर टीका केल्यानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राऊतांवर सडकून टीका केली आहे.
ADVERTISEMENT
आरक्षणावर बोलणी झाली
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण पुकारले, त्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली. भाजपच्या नेत्यानीही त्यांची भेट घेत मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचे अश्वासन दिले होते. त्यामुळे आम्ही त्यांची भेट घेतली होती. मराठा आरक्षणावर बोलणी झाली आहेत, त्यामुळे संजय राऊत यांना टीका करण्यासाठी काही कारण लागत नाही.
हे ही वाचा >> Maratha Reservation : सरकारच्या डोक्यात काय? एकीकडे आरक्षणाची मागणी, दुसरीकडे…
पिंजऱ्यातील पोपट
ज्या लोकांनी आंदोलनाच्या ठिकाणी कधी तोंडही दाखवले नाही. टीका करणारे हे पिंजऱ्यातील पोपट असून मालक आला की, टिव टिव करतो, उद्धव ठाकरे दिसल्याशिवाय हे बोलत देखील नाहीत असा टोलाह त्यांनी त्यांना लगावला आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> मुलीनं आय लव्ह यू मम्मी-पप्पा लिहून जीवनयात्रा संपवली, नंतर आई-वडिलांनीच केला मोठा खुलासा
दानवेंची भूमिका
खासदार संजय राऊत यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली होती. त्यावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, जरांगे पाटील यांच्याकडे जाऊन आम्ही मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या मागणीनुसार आम्ही वाटचालही सुरु केली आहे. मात्र ज्यांनी कधी त्यांची भेटही घेतली नाही. ते आता आमच्यावर टीका करतात मात्र पिंजऱ्यातील पोपट काय बोलतो याच्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही अशी सडकून टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT