Sharad Pawar: ‘ईडीच्या भीतीने तिकडे गेले, आता म्हणतात राष्ट्रवादी…’, शरद पवारांनी सुनावलं

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीत फुट पडली आहे. या फुटीनंतर अजित पवार यांच्यासह 8 नेते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते. यानंतर अजित पवार यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचे अनेकदा मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम होते. आज पुन्हा शरद पवार यांनी आपली भूमिका मांडून अजित पवार गटावर टीका केली आहे. माझी खात्री आहे, आज ना उद्या अशा भेकड प्रवृत्तीच्या लोकांना जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही,अशी टीका शरद पवार यांनी अजित पवार गटावर केली आहे. (sharad pawar criticize ajit pawar group pune ncp splits maharashtra politics)

ADVERTISEMENT

शरद पवार पुण्यात बोलत होते. यांचे (अजित पवार गटाचे) पक्षांतर म्हणजे काय? तर आम्ही भाजपच्या दावणीला जाऊन बसतो. त्यामुळे आता भाजपच्या बाजूने बोलाव लागतं, मतदान करावं लागतं,अशी टीका अजित पवारांवर केली.

शरद पवार पुढे म्हणाले, तुमच्या केसेसवर आम्ही काही बोलत नाही, तुम्ही बाजू बदला, तर काही अडचण नाही, नाही बदलली तर तुमची जागा दुसरी आहे. पण यांना ईडीच्या भितीला तोंडच द्यायचे नाही आहे,त्यामुळे एकंदरीत कारवाईची स्थिती पाहून आपल्या काही सहकाऱ्यांनी (अजित पवार गटाने) रस्ता बदलला.आता हे राष्ट्रवादीचा असल्याच्या दावा करतात. आमची वैचारीक भूमिका बदलली नाही, फक्त इकडून जावे लागतेय,अशी भूमिका हे मांडतात, असे शरद पवार यांनी सांगितले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : CWC : अशोक चव्हाणांचं काँग्रेसकडून प्रमोशन! राष्ट्रीय कमिटीमध्ये महाराष्ट्रातील 8 नेते

पण राजकारणात सत्येची कास सोडून, कुणी दमदाटी करत असेल म्हणून तुम्ही त्या रस्त्याने जायचा निर्णय घेतला असेल तर माझी खात्री आहे, आज ना उद्या अशा भेकड प्रवृत्तीच्या लोकांना जनता वेगळ्या ठिकाणी पाठवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका शरद पवार यांनी अजित पवार गटावर केली.

तुम्ही वर्तमानपत्रे बारकाईने पाहिले पाहिजे, टेलिव्हिजन बघितले पाहिजे आणि काय चालले याचा विचार केला पाहिजे. महागाई, गुन्हेगारी काही संपत नाही. शेतकऱ्यांना बाजारपेठेत काही योग्य भाव मिळत नाही. या प्रश्नांची प्रत्येक माणसाला चिंता आहे,असेही शरद पवार यांनी जनतेला सांगितले.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील किती प्रकल्प इथून गूजरातला गेले. मी काही गुजरात भारताबाहेर असे म्हणत नाही. पण जो कारखाना राज्यात येणार होता, तो कारखाना येथून अन्य राज्यात हलवला गेला.यात चांगले काम करण्याची संधी राज्य सरकारने गमावली, अशी टीका देखील शरद पवार यांनी सरकारवर केली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : ‘नितीन गडकरींच्या खात्याचे घोटाळे PM मोदींनीच…’ ठाकरेंच्या खासदाराचं खळबळजनक वक्तव्य

    follow whatsapp

    ADVERTISEMENT