Ncp Split : सुनावणीआधी शरद पवारांना निवडणूक आयोगाने समन्स का पाठवलं?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

election commission of india sent summon to Sharad pawar
election commission of india sent summon to Sharad pawar
social share
google news

Sharad Pawar Ncp Marathi : खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची? हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात गेला आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना (शरद पवार गट आणि अजित पवार गट) बाजू मांडण्यास सांगितले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने आता शरद पवारांना समन्स पाठवलं आहे.

ADVERTISEMENT

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली फुटलेल्या गटाने राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि निवडणूक चिन्हावर दावा केला आहे. अजित पवार गटाने सत्तेत सामील होण्यापूर्वीच याची तयारी केली होती. महत्त्वाचं म्हणजे अजित पवार गटाने शरद पवारांना अध्यक्षपदावरून हटवून अजित पवारांना अध्यक्ष केल्याची माहिती निवडणूक आयोगाला दिली होती.

हेही वाचा >> शरद पवारांना धक्का.. ‘या’ निवडणुकीत मोठा पराभव

केंद्रीय निवडणूक आयोगात दोन्ही गटांनी आपापले दावे केले आहेत. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील फुटीवर शिक्कामोर्तब झाला आहे. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने आता शरद पवार यांना समन्स बजावले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शरद पवारांनी काय सांगितलं?

पुण्यातील जुन्नर भेटीवर असताना पत्रकारांनी पवारांना प्रश्न केला. निवडणूक आयोगासमोर बाजू कशी मांडणार? या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांनी निवडणूक आयोगाने मला समन्स पाठवले असल्याची माहिती दिली. ते म्हणाले, “पक्षावर दावा सिद्ध करण्यासाठी दोन तृतीयांश पाठिंबा दाखवावा लागतो, असा कायदा नाही. मला निवडणूक आयोगाचे समन्स आले आहे. 6 ऑक्टोबरला हजर राहण्यास सांगितले आहे. मी सुनावणीसाठी जाणार आहे. तसेच आमचे वकिलही हजर असतील आणि आम्ही आमची भूमिका मांडू”, असं शरद पवारांनी सांगितलं.

हेही वाचा >> भाजपचं ‘बंगाल पॅटर्न’! केंद्रीय मंत्री, खासदारांना का दिली विधानसभेची तिकीटं?

पक्ष, निवडणूक चिन्ह जाण्याची पवार गटाला भीती?

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना प्रकरणात एकनाथ शिंदेंच्या बाजूने निकाल दिला. समाजवादी पक्षात दोन गट झाल्यानंतर आयोगाने अखिलेश यादव यांच्या बाजूने बहुमत असल्याच्या निकषावर निकाल दिला होता. सध्या अजित पवार यांच्या सोबत 39 आमदार आहेत. तर 1 लोकसभा खासदार आणि 1 राज्यसभा खासदार आहे. त्यामुळे बहुमत अजित पवारांच्या बाजूने जाण्याची शक्यता असून, शरद पवार गटाला पक्ष आणि चिन्ह गमावण्याची भीती आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT