महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार का.. मुख्यमंत्री बदलणार?, शरद पवार म्हणाले; मला…

मुंबई तक

ADVERTISEMENT

sharad pawar reaction on cm changing movement
sharad pawar reaction on cm changing movement
social share
google news

Sharad Pawar on CM Changing Movement : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा, संजय राऊतांच (Sanjay Raut) सामनातून मुख्यमंत्रीपद जाण्याचं भाकीत आणि मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांची नाराजीतून अचानक सातारावारी. या सर्व घटनांमुळे राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनी वेग पकडलाय.तसेच यासंबंधीत दिल्लीत हालचाली सुरु असल्याचेही बोलले जात आहे. या मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांवर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला या प्रकरणा संबंधित काहीच माहिती नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.(sharad pawar reaction on cm changing movement and ajit pawar desire)

ADVERTISEMENT

शरद पवार काय म्हणाले?

मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांवर शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, मला काहीच माहित नाही. मुख्यमंत्री बदलायचा निकाल,म्हणजे तुम्हाला आम्हाला सांगायचे काहीच कारण नाही. आणि असे काही आहे, असे माझ्यावर कानावर देखील आले नाही.तसेच हे राऊतांच स्टेटमेंट असलं तरी ते पत्रकार लोकांना अधिक माहिती असते,असे देखील शरद पवार म्हणाले आहेत. दरम्यान अजित पवार (Ajit Pawar) यांचे भावी मुख्यमंत्री असल्याचे पोस्टर्सही झळकत आहे. या पोस्टरवर शरद पवार म्हणाले की, भावी मुख्यमंत्र्याच्या पोस्टरवरून अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे. असा वेडेपणा करू नका, असे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा : मुख्यमंत्री तीन दिवस सुट्टीवर? एकनाथ शिंदे म्हणाले, मी तर…

बारसू प्रकरणात आंदोलक प्रशासनाची बैठक घ्या

बारसूबाबत उद्या जिल्हा प्रशासन आणि स्थानिक यांच्यात चर्चा होणार आहे. या चर्चेनंतर मार्ग निघेल का हे बघितले पाहिजे. दरम्यान जर स्थानिक लोकांची नाराजी असेल तर त्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे,असे शरद पवार(Sharad Pawar) म्हणाले आहेत. कोकणात उद्योग वाढावे असे माननारा वर्ग आहे. मात्र जर प्रकल्प आले त्याबाबत काही विरोध असेल तर गैरसमज दूर केले पाहिजेत. आणि जर गैरसमज नसेल पण सद्यपरिस्थितीबाबत त्यांना नुकसान होईल असे वाटत असेल तर दुसरी जागा उपलब्ध असेल तर त्यावर विचार व्हावा, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला आहे.

हे वाचलं का?

बारसू रिफायनरी वादावर आज शरद पवार (Sharad Pawar) आणि उदय सामंत यांची भेट झाली होती. वाद सोडून काही अडचण नाही आहे, आम्ही काही कोणाची जमीन घेतली नाही. फक्त मातीचे सर्वेक्षणाचे काम सूरू होते, तेही आता थांबवण्यात आल्याची माहिती सामंत यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रकल्प करायचा आहे, तो घाई घाईत करू नका, जे आंदोलक आणि प्रशासनाची बैठक घ्या, असा सल्लाही शरद पवारांनी दिला.

हे ही वाचा : बारसूसाठी पंतप्रधानांना पत्र अन् ठाकरेंचा दुटप्पीपणा, मुख्यमंत्री काय म्हणाले?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT