"...तर महिलांसोबत उपोषणालाच बसेल...", सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा, नेमकं प्रकरण काय? 

मुंबई तक

ADVERTISEMENT

She also said that the same issue is raised every time even though her husband has addressed it.
She also said that the same issue is raised every time even though her husband has addressed it.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

"दोन्ही पक्ष फोडून चिन्ह घेण्याचं पाप केलं"

point

"...म्हणून मी या सरकारचा जाहीर निषेध करते"

point

सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला उपोषणाचा इशारा

Supriya Sule On Maharashtra Government : आमच्या आशा भगिनींनी सांगितलं की त्यांचे पाच हजार रुपये वाढवण्याचा शब्द दिला आहे. पण महाराष्ट्र सरकारने अजून दिलेले नाहीत. मी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सांगेल की, आमच्या आशा भगिनींना पाच हजार रुपये द्या. एक आठवड्याचा कालावधी देऊ. जर त्यांनी दिले नाही. तर या राज्याच्या आशा वर्करसाठी सुप्रिया सुळे आंदोलन नाही, उपोषणाला बसेल. हा शब्द मी तुम्हाला देते. यांचं जे सुरु आहे, ते फक्त आणि फक्त निवडणूक आणि मतांसाठी चालतं. लोकसभेच्या आधी यांना शेतकरी आणि बहीण आठवली होती का? कुणीही आठवलं नव्हतं. पक्ष फोडा, घरं फोडा, चिन्ह न्या, हे सर्व उद्योग या सरकारने केले आहेत, असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका करतानाच उपोषणाचा इशारा दिला आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मेळाव्यात बोलत होत्या.(Our Asha sisters said that they have promised to raise five thousand rupees. But the Maharashtra government has not given yet. I will tell the Chief Minister through a letter to give five thousand rupees to our Asha sisters)

ADVERTISEMENT

"...म्हणून मी या सरकारचा जाहीर निषेध करते"

राज्य सरकारवर टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्र सरकार एकीकडं म्हणतं पैसे आहेत, दुसरीकडे म्हणतं पैसे नाहीत. आता २७ हजार कोटी रुपयांच्या नवीन रस्त्यांबाबत ते म्हणतात. माझा मेट्रोला विरोध नाही. पण मेट्रोसाठी १८-२० हजार कोटी रुपये दिले जातात. पण आमच्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि महिलांना काही हजार रुपये हे सरकार देत नाही. अशा सरकारचा मी जाहीर निषेध करते. जेव्हा आपलं सरकार येईल तेव्हा विकास होईलच. विकास थांबणार नाही. ज्या कष्ट करणाऱ्या महिला आहेत. त्यात बचत गटातील महिला आणि आशा वर्कर असतील.

हे ही वाचा >> Uddhav Thackeray: 'दिल्लीच्या मालकाची सुपारी घेऊन...', ठाकरेंची अदानी-लोढांवर जहरी शब्दात टीका!

"दोन्ही पक्ष फोडून चिन्ह घेण्याचं पाप केलं"

 पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला. उद्धव ठाकरे यांच्या वडिलांनी (बाळासाहेब ठाकरे) पक्ष स्थापन केला. तो पक्ष त्यांच्या वडिलांनी हयात असताना उद्धवजींना दिला. उद्धवजींना त्यांच्या वडिलांनी पक्ष, चिन्ह दिलं. हे दोन्ही पक्ष फोडून चिन्ह घेण्याचं पाप हे अदृष्य शक्ती आणि भारतीय जनता पक्षाने केलं आहे. हे तुम्हाला मान्य आहे का? तुमच्या वडिलांच्या नावाची जमिन मी काढून घेतली, तर तुम्हाला चालेल का? मी महाराष्ट्रात लढाई लढते, ती बरोबर आहे का? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> मविआचं सरकार आल्यावर लाडक्या बहिणींना किती पैसे मिळणार? संजय राऊतांनी आकडाच सांगितला

आज माझ्यावर अन्याय झाला आहे. तुमच्यावरही अन्याय होत आहे. आशा वर्कर यांच्यावरही अन्याय होतोय. आपण गप्प बसलो तर ते आपल्या घरात बसून आपली घरंही लुबाडतील, अशी ही लोकं आहेत. पंधराशे रुपये घ्या, माझं काहीही म्हणणं नाही. तुमच्या अधिकाराचे पैसे आहेत. कुणीही उपकार करत नाही. स्वत:च्या खिशातून पैसे देत आहेत का? असा सवाल उपस्थित करत सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारला सुनावलं.
 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT