Telangana Election Result : ”BRS चे आमदार काँग्रेसच्या संपर्कात”, के.सी. राव यांचं वाढलं टेन्शन

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

telangana election result 2023 brs mla in touch congress renuka chaudhary statement k Chandrashekhar rao
telangana election result 2023 brs mla in touch congress renuka chaudhary statement k Chandrashekhar rao
social share
google news

Telangana election Results 2023 Latest Updates in Marathi : तेलंगणामध्ये सुरुवातीच्या आलेल्या निकालानुसार काँग्रेस आघाडीवर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली आहे. तसेच काँग्रेसकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींनाही वेग आला आहे. असे असताना काँग्रेस नेत्या रेणूका चौधरी (renuka chaudhary) यांनी निकालाआधीच खळबळजनक विधान केले आहे. रेणूका चौधरी यांनी भारत राष्ट्र समितीचे (BRS)चे आमदार संपर्कात असल्याची माहिती दिली. त्यामुळे दोन वेळा तेलंगणाच्या सत्तेवर बसलेल्या बीआरएसला काँग्रेस खाली खेचते का? हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. (telangana election result 2023 brs mla in touch congress renuka chaudhary statement k Chandrashekhar rao)

ADVERTISEMENT

रेणूका चौधरी एएनआयएशी बोलत होत्या. आम्ही एक वर्षाहून अधिक काळ जनतेच्या नाडीवर लक्ष केंद्रित केले होते. यातून आम्हाला समजले की एक मोठा बदल होणार आहे आणि तेच होत आहे. जनता बीआरएसला कंटाळली आहे,त्यामुळे विजय आमचाच आहे, मला पूर्ण विश्वास आहे, असे रेणूका चौधरी म्हणाल्या आहेत.

हे ही वाचा : ‘मराठ्यांचं आणि ओबीसींच हा एकटाच खातो’, जरांगे पाटलांची भुजबळांवर टीका

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बीआरएस नेते काँग्रेसच्या संपर्कात आहेत का? असा प्रश्न विचारला असता रेणूका चौधरी म्हणाल्या, बीआरएसचे आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते कधी आमचे (आमदार) घेऊन जातात, तर कधी त्यांचे इथे येतात. आजचे राजकारण असे आहे. तसेच “आम्हाला आमच्या कोणत्याही आमदारावर शंका नाही. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे. तसेच मुख्यमंत्री निवडीची आमची प्रक्रिया अशीच आहे. निवडणुकीनंतर चर्चा करावी लागते. आमदारांसोबत चर्चा करून मुख्यमंत्री निवडायचे आहेत आणि अहवाल तयार करायचा आहे, असे रेणूका चौधरी म्हणाल्या आहेत.

हे ही वाचा : Kalyan crime : पत्नी आणि मुलाच्या हत्येचं कारण आलं समोर, घटनाक्रम ऐकून पोलिसही चक्रावले!

या निवडणूकीत सर्वाधिक नुकसान AIMIM पक्षाचे आणि ओवेसी यांचे झाले आहे. त्यांनी राष्ट्रीय स्तरावर उचललेल्या चुकीच्या पाऊलामागील सत्य लोकांना समजले. हे दुर्दैवी आहे कारण मी त्यांना नेहमीच बुद्धिमान माणूस समजत होते. जेव्हा काँग्रेस एकजुटीने लढते तेव्हा देशातील कोणतीही शक्ती आमच्या विरोधात उभी राहू शकत नाही, असा विश्वास देखील रेणूका चौधरी यांनी व्यक्त केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT