Shiv Sena : ठाकरेंच्या खासदाराचे शिंदे-पवारांवर टीकास्त्र, ‘खाल्ल्या ताटात घाण…’
लोकसभेच्या जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला तयार झाला नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे. सध्या ज्या पक्षाने, ज्या जागा जिंकल्या आहेत. त्या जागा त्या पक्षाकडेच राहतील, हा फॉर्म्युला निश्चित झाला आहे, असे विनायक राऊत यांनी सांगितले आहे.
ADVERTISEMENT
Thackeray Group Criticize Shinde and Pawar Group : गोकुळ कांबळे, रत्नागिरी : देशात लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत. तत्पुर्वी राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. असे असतानाच ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी शिवसेनेच्या शिंदे गटावर (Shinde Group) आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar Group) गटावर हल्ला चढवला आहे. खाल्ल्या ताटात घाण करणारी शिंदे गटाची आणि अजित दादा गटाची राजकीय औलाद असल्याची टीका विनायक राऊत यांनी केली आहे. तसेच ज्यांनी तुम्हाला मोठं केले त्यांचे उपकार तर विसरू नका, असे देखीत राऊत म्हणाले आहेत. (thackeray mp vinayak raut criticize cm eknath shinde and ncp ajit pawar group loksabhe election 2024)
ADVERTISEMENT
रत्नागिरीत उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परीषदेत विनायक राऊत यांनी लोकसभा निवडणूकीसह राज्याच्या अनेक मुद्यावर भाष्य केले. शिवसेनेला सत्तेवरून पाय उतार करण्यासाठी भाजपने रचलेल्या षडयंत्रात शिंदे गट सामील झाला. त्यामुळेच निवडणूक आयोग म्हणा किंवा इतर यंत्रणा म्हणा, ही सुद्धा भाजपची भटीक बनली आणि शिवसेनेच धनुष्यबाण, बाळासाहेबांचे चित्र आणि नाव सुद्धा चोरलं गेले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी चोरांचा महामेरू असा भाजपचा केलेला उल्लेख योग्यच केल्याचे विनायक राऊत यांनी यावेळी म्हटले.
हे ही वाचा : Mumbai Crime : ‘तुला भेटून चूक झाली’ म्हणत तरूणाने संपवलं आयुष्य, पण…
दुदैवाने खाल्ल्या ताटात घाण करणारी शिंदे गटाची आणि अजित दादा गटाची राजकीय औलाद आहे. त्यामुळे ज्यांनी मोठं केलं त्यांचे उपकार तर विसरू नका. पण उपकाराची परतफेड अबकाराने करण्याची विकृती शिंदे आणि अजितदादा गटाच्या मनामध्ये आहे.तसेच देशात अशी विकृती कुठेच नाही आहे, अशी टीका विनायक राऊतांनी शिंदे आणि पवारांवर केली.
हे वाचलं का?
लोकसभा निवडणूकीवर काय म्हणाले?
लोकसभेच्या जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला तयार झाला नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे. सध्या ज्या पक्षाने, ज्या जागा जिंकल्या आहेत. त्या जागा त्या पक्षाकडेच राहतील, हा फॉर्म्युला निश्चित झाला आहे, असे विनायक राऊत यांनी सांगितले आहे. पण कुणाकडे सक्षम उमेदवार नसल्यास त्या ठिकाणी उमेदवार बदलले जावेत असाही सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले.
हे ही वाचा : Mumbai : कर्तव्य बजावून घरी परतताना काळाचा घाला, पोलीस शिपायाचा मांजाने चिरला गळा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT