शिंदेंच्या शिवसेनेचे 'हे' 11 आमदार होणार मंत्री, दोन दिग्गजांना डच्चू?

मुंबई तक

Shiv sena Minister list: राज्य मंत्रिमंडळात समावेशासाठी शिवसेनेने आपल्या माजी मंत्री आणि संभाव्य मंत्र्यांची यादी तयार केली आहे. यावेळी नवीन चेहऱ्यांना स्थान मिळताना दिसत आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शिवसेनेच्या कोट्यातील 11 आमदार मंत्री होऊ शकतात

point

सरकार स्थापनेनंतर आता मंत्रिमंडळ स्थापनेची प्रक्रिया सुरू

point

शिवसेनेच्या दोन नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो

मुंबई: महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले असून त्यात महायुतीचे दोन पक्ष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी हेही समाविष्ट आहेत. ज्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. सरकार स्थापनेनंतर आता मंत्रिमंडळ स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. ताजी बातमी अशी आहे की, यावेळी शिवसेनेच्या कोट्यातील 11 आमदार मंत्री होऊ शकतात.

राज्य मंत्रिमंडळात समावेशासाठी शिवसेनेने आपल्या माजी मंत्री आणि संभाव्य मंत्र्यांची यादी तयार केली आहे. यावेळी दोन नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो. त्याऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते.

हे ही वाचा>> Viral News: 16 लाखांची 'ही' सर्जरी करून मॉडेल होणार पुन्हा VIRGIN! आहे तरी कोण?

'या' दोन मंत्र्यांचे पत्ते होणार कट?

माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांची मागील कामगिरी आणि आरोप लक्षात घेता त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. शिवसेनेकडून ५ नवीन आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.]

हे ही वाचा>> India Alliance : उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी यांच्याकडे नेतृत्व द्यावं, बड्या नेत्याचा राहुल गांधींवर अविश्वास?

शिवसेनेचे मंत्रिपदाचे दावेदार भरतशेठ गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर आणि विजय शिवतारे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. महायुतीत शिवसेनेला 13 ते 14 मंत्रिपदे मिळतील, असे मानले जात आहे. त्यापैकी 10 ते 12 मंत्री या आठवड्यात शपथ घेणार आहेत.

हे 11 आमदार होणार मंत्री!

शिवसेनेची पात्रता चाचणी उत्तीर्ण होऊन मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या संभाव्य मंत्र्यांची ही माहिती पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात बसणारे संभाव्य मंत्री पुढीलप्रमाणे-

1) गुलाबराव पाटील
२) उदय सामंत
3) दादा भुसे
4) शंभुराज देसाई
५) तानाजी सावंत
6) दीपक केसरकर
7) भरतशेठ गोगावले
8) संजय शिरसाट
9) प्रताप सरनाईक
10) अर्जुन खोतकर
11) विजय शिवतारे

राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागांवर निवडणुका झाल्या. यावेळी निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष ठरला आणि 132 जागांवर विजय मिळवला. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेला 57 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाचे संख्याबळ 43 आहे. म्हणजे मंत्रिमंडळ आणि राज्यमंत्र्यांची संख्या यापेक्षा जास्त असू शकत नाही. मागील सरकरमध्ये आतापर्यंत तिन्ही पक्षांचे 29 मंत्री होते. त्यात भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी 10 आणि राष्ट्रवादीचे 9 मंत्री होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp