Uddhav Thackeray: 'दिल्लीच्या मालकाची सुपारी घेऊन...', ठाकरेंची अदानी-लोढांवर जहरी शब्दात टीका!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
social share
google news

बातम्या हायलाइट

point

"...तरीही विरोधक मिठाचा खडा टाकतात"

point

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

point

उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका

Uddhav Thackeray Speech : "मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री हे सरकार नाही. तर आयुष्यभर जे काम करतात, ते खरं सरकार चालवतात. मोक्याचे भुखंड अदानीच्या घशात टाकायचे. आरसीएफ सुद्धा अदानीच्या घशात घालण्याचा यांचा डाव आहे का? तुमच्या मालमत्ता लोढाच्या घशात घातल्या जात आहेत. मग आम्ही जायचं कुठं? वांद्रे सरकारी कर्मचाऱ्यांची जी वसाहत आहे, त्यांना तिथल्या तिथे घरं मिळालीच पाहिजेत. मी मुख्यमंत्री असताना ती घरं दिली होती. त्यांना घर मिळालीच पाहिजेत, त्यासाठी शिवसेना आजही आग्रही आहे. भूखंड मागायचा असेल, तर अदानीला दिलेला जो वांद्रे रेक्लेमेशनचा भूखंड आहे ना, तिथे सरकारी कर्मचाऱ्यांना हक्काची घरं द्या. मिंधेच्या हातातलं एमएसआरडसी खातं आहे. आमचं सरकार पाडल्यावर दिल्लीच्या मालकाची सुपारी घेऊन मुंबईच्या हक्काचा भूखंड बुलेट ट्रेनला देऊन टाकला", असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. ते शिवसेना ठाकरे गटाच्या कर्मचारी युनियनच्या कार्यक्रमात बोलत होते. 

ADVERTISEMENT

"...तरीही विरोधक मिठाचा खडा टाकतात"

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, १९६६ चा काळ पुन्हा उभा करायचा का? असा विचार जर आम्ही केला. तर मग आमचं त्यात चुकलं काय? १९६६ ते २०२४ सर्व गुण्यागोविंदाने राहत आहेत. सर्व हिंदू म्हणून राहत आहेत. त्या हिंदूंचं रक्षण आम्ही हिंदू म्हणून केलं. आता इतर समाजाची लोकं येत आहेत. एव्हढं सर्व चांगलं सुरु असता तुम्ही मिठाचा खडा का टाकत आहेत?  देशातील अन्नदात्याला तुम्ही खतं देता.

लोकसभेच्या वेळी मी पाहिलं होतं, खतांच्या पिशवीवरही मोदींचा फोटो असतो. लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरही मोदींचा फोटो होता. कारण लस त्यांनी तयार केली असा आमच्या उपमुख्यमंत्र्यांचा शोध होता. लस त्यांनी तयार केली, हे मान्य केलं आम्ही. पण खतांचं काय? खत कुणी तयार केलं? त्याचा तर काही संबंध नाही. पण राष्ट्रीय विचाराला खतंपाणी टाकणारी तुमची सर्वात मोठी कंपनी आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Kolkata Rape And Murder Case: २४ तासांसाठी OPD बंद, रुग्णांचे प्रचंड हाल; डॉक्टरांचा संप का?

"शेतकऱ्यांना बोगस बी बीयाणे आणि खतं दिली जातात"

नुसतं राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर नाही. तर राष्ट्रीय विचारांचं जे बी बियाणं आहे, ते आणखीन फोफावलं पाहिजे. त्याला अंकूर फुटले पाहिजेत. ते सक्षम असलं पाहिजे. ते काम तुम्ही करत आहात. शेतकऱ्यांचे मुद्दे मी ग्रामिण भागात मांडत असतो. पण शेतकऱ्याला बोगस बियाणं दिलं तर होणार काय? अत्यंत निकृष्ट दर्जाची खतं दिली, तर करणार काय? असा सवालही ठाकरेंनी उपस्थित केला.

मेहनत घेऊन बोगस बी बीयाणे असतील तर त्याचा काय फायदा? शेतकऱ्याला वाटतंय ही आरसीएफ ही माझी कंपनी आहे. याशिवाय त्यांना अभिमान वाटत असेल की, ही आरसीएफ माझ्या शिवसेनेच्या हक्काची युनियन आहे. तुम्ही बोगस बीयाणं उखडून टाकलं आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधला.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> मविआचं सरकार आल्यावर लाडक्या बहिणींना किती पैसे मिळणार? संजय राऊतांनी आकडाच सांगितला

    follow whatsapp

    ADVERTISEMENT