ठाकरे फडणवीसांना म्हणाले, 'मी सगळा खर्च करतो'; बावनकुळेंनीही केला पलटवार

मुंबई तक

ADVERTISEMENT

ठाकरेंचा फडणवीसांवर वार, बावनकुळेंनी केला पलटवार.
चित्रपटावरून ठाकरे, फडणवीस, बावनकुळे यांच्यात कलगीतुरा.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधींवर टीका

point

उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीसांवर टीका

point

चंद्रशेखर बावनकुळे यांची ठाकरेंवर टीका

Uddhav Thackeray Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानानंतर राज्याच्या राजकारणात चांगलाच कलगितुरा रंगला. राहुल गांधींना फडणवीसांना टोला लगावल्याच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी टीका केली. त्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिले. काय आहे मुद्दा जाणून घ्या...

ADVERTISEMENT


वि. दा. सावरकर यांच्या जीवनावरील चित्रपट बघितल्यानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, "सावरकरांवर सातत्याने टीका करणाऱ्या राहुल गांधी यांनी चित्रपट पाहावा, त्यांच्यासाठी थिएटर बुक करण्याचा खर्च मी करतो."

हेही वाचा >> सांगलीची जागा काँग्रेसला देणार?; ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका 

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या टीकेबद्दल जेव्हा उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी फडणवीसांना काही ठिकाणी जाण्याचे आव्हान दिले. इतकंच नाही, तर त्यासाठीचा खर्च आपण करू असे ठाकरे म्हणाले. 

हे वाचलं का?

ठाकरे फडणवीसांना उद्देशून काय म्हणाले?

"मी देवेंद्र फडणवीसांचा जाण्या-येण्याचा, हॉटेलचा खर्च करतो; त्यांनी मणिपूरमध्ये जाऊन यावे. आणि लडाख मध्ये जाऊन यावे. त्यानंतर दार्जिलिंगमध्ये नीरज झिम्बा म्हणून आहे, त्यांना दिलेली वचने कशी मोडली, त्यांना जाऊन भेटावं. अरुणाचल प्रदेशमध्ये जाऊन यावे. त्यांच्या जाण्या-येण्याचा, राहण्याचा खर्च करायला मी तयार आहे. काश्मिरी पंडितांना त्यांनी भेटावं. बॉयकॉट बॉलिवूडवाले आता बॉलिवूडच्या नांदी लागलेत. त्याच्यामुळे एखादा प्रोड्युसर घेऊन त्यांनी मणिपूर फाईल्स हा चित्रपट काढावा." 

टोमणेसम्राट...चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर पलटवार

उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर टीका केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले. बावनकुळे यांनी काही प्रकरणांचा उल्लेख करत ठाकरेंवर पलटवार केला. 

ADVERTISEMENT

बावनकुळे म्हणाले, "मद्य घोटाळ्याचे आरोपी अरविंद केजरीवाल यांच्या बचावासाठी आयोजित ‘ठगो का मेला‘ कार्यक्रमासाठी उबाठा गटाचे नेते आणि टोमणे सम्राट उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचले आणि टोमणे मारण्याचा कार्यक्रम केला. देवेंद्र फडणवीसजींनी पिक्चर काढायचा ठरवलाच तर ‘१०० कोटी वसुली फाईल्स'ची स्क्रिप्ट तयार आहे. त्याची काळजी उद्धव ठाकरेंनी करू नये."

ADVERTISEMENT

हेही वाचा >> वंचितचं मविआसोबत का फिस्कटलं? आंबेडकरांनी सांगितलं कारण

"याशिवाय ‘वाझे की लादेन फाईल्स', ‘खिचडी फाईल्स', ‘कोविड बॅग फाईल्स' असे अनेक चित्रपट काढता येतील. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी टोमणे मारण्यापूर्वी घरात बसून केलेल्या अडीच वर्षाच्या कारभाराचा विचार करावा. बाकी तुम्ही देवेंद्रजींना कितीही टोमणे मारले तरी महाराष्ट्रातील जनता लोकसभा निवडणुकीत तुम्हाला कायमचा टोमणा मारल्याशिवाय राहणार नाही", असे उत्तर बावनकुळे यांनी दिली. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT