‘रिफायनरी लोकांच्या हिताची मग जबरदस्ती का?’ बारसूवरून उद्धव ठाकरे संतापले
Uddhav Thackeray reaction on Barsu refinery:बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी पंतप्रधानांना पत्र लिहल्याचा उल्लेख सत्ताधारी नेत्यांनी करून ठाकरे आता का विरोध करतायत? असा प्रश्न उपस्थित केला होता.याच प्रश्नावर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray reaction on Barsu refinery : रत्नागिरीच्या राजापूरमध्ये प्रस्तावित असलेल्या बारसू रिफायनरी (Barsu refinery) प्रकल्पावरून राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी पंतप्रधानांना पत्र लिहल्याचा उल्लेख सत्ताधाऱ्यांनी करून उद्धव ठाकरेंनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. याच प्रकरणात आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना कडक शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.(uddhav thackeray reaction on barsu refinery project rajapur ratnagiri)
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) भारतीय कामगार सेनेच्या 55 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.यावेळी ठाकरे यांनी बारसू रिफायनरी (Barsu refinery) प्रकल्पावर प्रतिक्रिया दिली होती. बारसूवरून सध्या रान पेटवले जात आहे. उद्धव ठाकरेंनी पत्र दिलं होतं असा उच्चार करत ठाकरेंनी, हो दिले होतं असा होकार देत मी कुठे नाही म्हटलं, असे देखील ते म्हणाले. पण मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा आम्ही काय करणार होतो.जर मी पत्र दिलं होते तर अडीच- तीन वर्ष प्रकल्प राबवला का नव्हता. मी कुठलीच जोर जबरदस्ती केली नाही,असे देखील ठाकरे म्हणाले आहेत.जर लोकांचा हिताचा प्रकल्प आहे,तर जबरदस्ती का करताय, असा सवाल देखील त्यांनी केला.
हे ही वाचा : भीमा पाटस साखर कारखान्यात 500 कोटींचा घोटाळा, संजय राऊतांचा गंभीर आरोप
उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) तुम्ही इतकं ऐकता, मग गद्दारी करून सरकार का पाडलंत,आरेचा निर्णय़, कार्जुरमार्गचा निर्णय़ का फिरवलात,असा सवाल देखील ठाकरेंनी शिंदे गटाला केला. बुलेट ट्रेनची जागा सोन्यासारखी आहे. बुलेट ट्रेन जरूर आणा, पण तुमच्यापैकी किती जण रोज उठून अहमदाबादला जाऊन परत येणार आहे ? असा सवाल ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
एखाद्याच्या हिताची गोष्ट आहे,मग टाळकं फोडून का सांगताय़.हा तुझ्या भल्याचा प्रकल्प आहे. जर हिताचा प्रकल्प आहे तर जोर जबरदस्ती करण्याची वेळ का यावी? असा सवाल ठाकरे यांनी केला आहे. यासोबत प्रकल्पा संदर्भातले समज गैरसमज लोकांसमोर ठेवाना. आमचे धोरण हेच होते लोकासमोर प्रेझेंटेशनन करून त्यांना प्रश्न विचारायाल लावायची. या प्रश्नाची उत्तरे मिळाल्यानंतर बारसूला रिफायनरी करायचं ठरलं होते. इतकी पारदर्शकता होती आमच्या धोरणात,असे ठाकरे म्हणाले.मी मुख्यमंत्री म्हणून मला जे शक्य होते ते मी केलं.ज्या पद्धतीने पाठीत वार केला त्याचा तर सुड आणि बदला घेणारचं, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.