Uddhav Thackeray : 'जरांगेंना मारण्याचा कट'; ठाकरे म्हणाले, 'त्याची...'

हर्षदा परब

Uddhav Thackeray Manoj Jarange SIT Probe : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे.

ADVERTISEMENT

uddhav Thackera on Manoj Jarange's SIT Probe
उद्धव ठाकरे मनोज जरांगे यांच्या एसआयटी चौकशीबद्दल काय बोलले?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मनोज जरांगेंबद्दल उद्धव ठाकरे काय बोलले?

point

ठाकरेंचा रश्मी शुक्लांना टोला

point

जरांगेंची सरकारकडून एसआयटी चौकशी

Uddhav Thackeray on Sit Inquiry of Manoj Jarange Protest : अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी या मुद्द्याबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी भूमिका मांडली. 

जरांगे पाटील यांच्यावर एसआयटी लावण्यात आली आहे. जरांगे पाटलांचे बोलविते धनी हे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राजेश टोपे आहेत, असे आरोप भाजपने केले आहेत. या आरोपांवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारला सुनावले.  

महिलांची डोकी फोडली, छऱ्याच्या गोळ्या घातल्या...

उद्धव ठाकरेंनी सरकारला कानपिचक्या लगावत भाष्य केले. ठाकरे म्हणाले, "बघा, मला असं वाटतं की हे अत्यंत निर्घृण प्रकार आहे. ज्यावेळी जरांगे पाटील हे आंदोलनाला बसले होते. त्या काळात म्हणजे १ ऑगस्ट... इंडियाची बैठक झालेली. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांच्यावर निर्घृण लाठीहल्ला झाला."

"अश्रुधुर सोडले. छर्ऱ्याच्या गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. महिलांची डोकी फोडली होती. शरद पवार गेले होते. मी सुद्धा गेलो होतो. जणू काही हे अतिरेकी घुसले असं त्यांना वागवलं गेलं", असे म्हणत ठाकरेंनी या प्रश्नाला उत्तर दिले. 

ठाकरेंचा रश्मी शुक्लांना टोला

शरद पवारांनी जरांगेंना फोन केले, असा आरोपही प्रविण दरेकर यांनी केला. याच अनुषंगाने ठाकरे म्हणाले, "आमच्याकडनं त्यांना कुणी किती फोन केले. मला असं वाटतं की, आताच्या ज्या महासंचालक आहेत, त्या यातल्या एक्स्पर्ट आहेत. त्यांच्याकडे जरांगे पाटलांच्या फोनचा रेकॉर्ड असेल, आमच्याही फोनचा रेकॉर्ड असेल, देवेंद्र फडणवीसांनी तो घ्यावा. आणि समजा आम्ही जरांगे पाटलांच्या मागे आहोत, तरी देखील त्यांचं असं काय चुकतंय हे त्यांना तुम्ही सांगण्याचा प्रयत्न का करत नाही."

जरांगेंना अतिरेकी ठरवणार आहात का?

"कुणी आंदोलनाला उभं राहिलं तर त्याच्यावर तुम्ही त्याला गुन्हेगार ठरवायचं. ज्या पद्धतीने उत्तरेतील शेतकरी एक-दीड वर्षापूर्वी आंदोलनाला उतरले होते. त्यांना अतिरेकी ठरवण्यापर्यंत मजल गेली होती. आता जरांगे पाटलांना तुम्ही अतिरेकी ठरवणार आहात का? हा एवढाच भाग राहिला आहे. म्हणजे कुणी न्याय हक्कासाठी उतरायचंच नाही", असे म्हणत ठाकरेंनी शिंदे सरकारवर हल्ला चढवला. 

ठाकरे पुढे म्हणाले, "ठीक आहे. एखाद्याची मागणी कदाचित चुकीची असेल किंवा पूर्ण करता येत नसेल, तर त्याला विश्वासात घेणं हे राज्यकर्त्यांचं काम असतं. त्याला गुन्हेगार ठरवणं हे राज्यकर्त्यांचं काम नसतं. असा राज्यकर्ता बिनकामाचा असतो."

मला मारण्याचा कट रचला गेला आहे, असा आरोप जरांगेंनी केला आहे. याकडे माध्यमांच्या प्रतिनिधींनी ठाकरेंचं लक्ष वेधलं. त्याला उत्तर देताना ठाकरे म्हणाले की, "त्याची एसआयटी चौकशी करा. आम्ही कुठे काय म्हणतोय. मूळात जरांगे पाटलांनी जी मागणी केली आहे, त्या मागणीबद्दल ती सोडून त्यांच्यामागे का लागताहेत? त्यांच्या मागण्यांच्या मागे लागा ना", असा टोलाही ठाकरेंनी लगावला. 

"जर जरांगे पाटलांच्या मागे आम्ही आहोत असा आरोप तुम्ही करत असाल, तर एक दीड महिन्यापूर्वी गुलाल कुणी उधळला होता? फटाके कुणी फोडले होते? जर तुम्ही त्यांची एसआयटी चौकशी लावत असाल, तर माझं म्हणणं आहे की, एसआयटी चौकशी चिवटपणाने करा. मध्ये सोडू नका", असा चिमटा ठाकरेंनी शिंदे-फडणवीसांना काढला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp