Maharashtra Bandh : "नराधमाला पाठिशी घालणारं विकृत सरकार..."; भर पावसात उद्धव ठाकरे संतापले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray Todays Speech
Uddhav Thackeray Todays Speech
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर घणाघात

point

बदलापूर प्रकरणावरून उद्धव ठाकरे भडकले

point

भर पावसात उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारचा घेतला समाचार

Uddhav Thackeray On Badlapur Case : महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी काळी पट्टी बांधून बदलापूरमध्ये दोन बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेध व्यक्त केला. महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्या मविआला उच्च न्यायालयाचे आदेशामुळे बंद मागे घ्यावा लागला. परंतु, उद्धव ठाकरे यांनी बंद मागे घेतलं असतानाही राज्य सरकारवर घणाघात केला.

"आपल्या महाराष्ट्रावर घटनाबाह्य सरकार राज्य करतंय. मला या सरकारची कीव येते की त्यांनी नराधमाच्या विरुद्ध उभं राहण्याच्या ऐवजी नराधमाला पांघरून घालण्याचं काम करत आहेत. ज्यावेळी सर्व दारं बंद होतात, तेव्हा जनतेला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नसतो. या नराधमांना पाठिशी घालणारे याचिकाकर्ते किंवा आणखी कुणी असतील, तर ते सुद्धा विकृत आहेत, असं म्हणत ठाकरेंनी महायुती सरकारवर घणाघाती टीका केली. (Instead of standing against the Culprits, they are working to cover up the genocide. When all the doors are closed, people have no choice but to take to the streets. If there are petitioners or anyone else who supports this, they are also perverts, Thackeray took a dig at the Mahayuti government)

उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर घणाघात

उद्धव ठाकरे राज्य सरकारवर टीका करत म्हणाले, "आपल्या महाराष्ट्रावर घटनाबाह्य सरकार राज्य करतंय. मला या सरकारची कीव येते की त्यांनी नराधमाच्या विरुद्ध उभं राहण्याच्या ऐवजी नराधमाला पांघरून घालण्याचं काम करत आहेत. ज्यावेळी सर्व दारं बंद होतात, तेव्हा जनतेला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नसतो. आज आपण महाराष्ट्र बंदचा पुकार केला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या सरकारमध्ये हिंमत नाही आहे. आजचा महाराष्ट्र बंद हा कडकडीत झाला असता. याची जाणीव सरकारला झाली. संकटाचा सामना करण्याची यांची हिंमत नाही. महाराष्ट्र बंद कडकडीत होणारच,याचा त्यांना अंदाज आला. त्यानंतर त्यांनी त्यांचे चेलेचपाटे कोर्टात पाठवले आणि कोर्टाकडून आपल्या महाराष्ट्र बंदला अडथळा निर्माण केला गेला.

हे ही वाचा >> IMD Rain Alert : महाराष्ट्रात 'या' शहरात कोसळणार पावसाच्या सरी? पावसाची आजची स्थिती जाणून घ्या

आपली केस सर्वोच न्यायालयात दोन वर्षांपासून तारीख पे तारीख अशी सुरु आहे. न्याय मिळेल याचा आम्हाला विश्वास आहे. पण कोर्ट तेवढ्या तत्परतेनं हलू शकतं, हे काम कोर्टानं दाखवल्याबद्दल मी कोर्टाचं अभिनंदन करतो. कोर्टाने ठरवलं तर कोर्ट तात्काळ निर्णय घेऊ शकतात. आज आपण सर्व जमल्यानंतर सरकारला कळलं असेल, जरी तुम्ही आमच्या बंदला बंद केलं असेल, तरी महाराष्ट्राच्या प्रत्येक हृदयात आणि घरात या अत्याचाराविरुद्ध आमि मिंधे सरकारच्या विरोधात मशाल धगधगत आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Shikhar Dhawan: क्रिकेटमध्ये उंच 'शिखर' गाठलेल्या धवनने घेतला सर्वात मोठा निर्णय

"नराधमांना पाठिशी घालणारे याचिकाकर्तेही विकृत"

महिलांना सुरक्षा पाहिजे. मुलींना, बहिणींना, मातेला सुरक्षा पाहिजे, म्हणून आम्ही बंद केला होता. त्या बंदच्यामध्ये तुम्ही अडथळा आणला होता. गेल्या आठवड्यात भारत बंद झाला होता. आपल्या राज्यात तो जाणवला नाही. पण इतर काही राज्यात रेल्वेसुद्धा बंद झाल्या होत्या. तेव्हा हे याचिकाकर्ते कुठे गेले होते, या बंदला तेव्हा विरोध का गेला नव्हता.

ADVERTISEMENT

या नराधमांना पाठिशी घालणारे याचिकाकर्ते किंवा आणखी कुणी असतील, तर ते सुद्धा विकृत आहेत. जो कुणी महिलांवर अत्याचार करेल, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. पण त्यापेक्षाही भयानक त्यांच्या पापांवर पांघरून घालणाऱ्यांनाही शिक्षा झालीच पाहिजे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT