Uddhav Thackeray : ‘तुमचा राजकीय बाप…’, श्यामा प्रसाद मुखर्जींचं नाव घेत ठाकरेंनी भाजपला सुनावलं

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

udhhav thackeray criticize bjp on shyama prasad mukherji jana sangh nashik state level adhiveshan nashik maharashtra politics
udhhav thackeray criticize bjp on shyama prasad mukherji jana sangh nashik state level adhiveshan nashik maharashtra politics
social share
google news

Udhhav Thackeray Criticize BJP : स्वातंत्र्यासाठी लढणारी काँग्रेस नको म्हणून स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव मांडणाऱ्या मुस्लीम लीगसोबत बंगालमध्ये सरकार स्थापण केलीत. या सरकारमधील हकच्या मंत्रिमंडळात तुमचा राजकारणातला बाप म्हणजेच श्यामा प्रसाद मुखर्जी (shyama prasad mukherji) मंत्री होता, त्यांच्याबद्दल काहीतरी बोला, असे आव्हान उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी देत भाजपला (bjp) चांगलंच कोंडीत पकडलं आहे. (udhhav thackeray criticize bjp on shyama prasad mukherji jana sangh nashik state level adhiveshan nashik maharashtra politics)

ADVERTISEMENT

नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राज्यव्यापी महाअधिवेशन पार पडला आहे. या अधिवेशनातून बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जोडदार टीकास्त्र डागलं. यावेळी ठाकरे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात भाजप ही नव्हता आणि जनसंघही नव्हता. पण संयुक्त महाराष्ट्राची समिती ही जागावाटपासाठी जनसंघाने फोडल्याचा आरोप त्यांनी केला.

हे ही वाचा : “सध्याचा रावणही अजिंक्य नाहीये”, संजय राऊतांचं नाशिकमध्ये घणाघाती भाषण

दरम्यान आधीचा जो जनसंघ होता, तो श्यामा प्रसाद मुखर्जींनी स्थापन केला होता. 1940-42 मधला तो काळ होता, तेव्हा श्यामा प्रसाद मुखर्जींनी बंगालमध्ये होते. त्यावेळी 40 च्या सुमारास देशातल्या मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानाचा ठराव केला होता. स्वातंत्र्यलढ्यात लढणारी काँग्रेस नको म्हणून स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव करणाऱ्या मुस्लीम लीग बरोबर श्यामा प्रसाद मुखर्जींनी बंगालमध्ये सरकार स्थापण केले होते. आणि 11 महिने त्या हकच्या मंत्रिमंडळात श्यामा प्रसाद मुखर्जी म्हणजे, तुमचा राजकारणातला बाप हा त्यांच्यामध्ये मंत्री होता, असा हल्ला ठाकरेंनी भाजपवर चढवला होता.

हे वाचलं का?

आता तुम्ही श्यामा प्रसाद मुखर्जींबद्दल बोला काही, तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवता, पण तुमची जन्मकुंडली मांडा ना पहिला. हे सगळ बघितल्यावर यांची लायकी कळते, अशी टीका देखील ठाकरेंनी भाजपवर केली.

हे ही वाचा : Ram Mandir : कपाळी टिळा, रत्नजडित दागिने… रामलल्लाच्या अलौकिक श्रृंगाराचे वैशिष्ट्य काय?

पंतप्रधानांवर टीका

ठाकरेंनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला होता. पण कुणीतरी एकाने पंतप्रधान मोदी यांची बरोबरी केली, आजचे पंतप्रधान म्हणजे आमचे शिवाजी महाराज अजिबात नाही. जर शिवाजी महाराज जन्माला आले नसते, तर आज राम मंदिर उभं राहु शकलं नसत. आज प्रभू श्रीराम कोणत्याही एका व्यक्तीची किंवा पक्षाची मालमत्ता नाही. तसं तुम्ही करत असाल तर आम्हालाही भाजपमूक्त राम करावा लागेल. नुसत जय श्री राम नाही भाजपमुक्त श्रीराम, असा नारा देत ठाकरेंनी मोदींवर टीका केली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT