गृहमंत्री अमित शाह रायगडावर आले, औरंगजेबाच्या कबरीबाबत काय म्हणाले?
Amit Shah Raigad Speech : आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगड किल्ला संवर्धन समितीकडून विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

रायगडावर अमित शाहांची तोफ धडाडली

"छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करायला..."

अमित शाहा भाषणात नेमकं काय म्हणाले?
Amit Shah Raigad Speech : आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगड किल्ला संवर्धन समितीकडून विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. फडणवीसांसोबतच एकनाथ शिंदेंनाही भाषण करण्याची संधी मिळाली. परंतु, अजित पवारांनी भाषण केलं नाही. दरम्यान, अमित शाहा यांनी आपल्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेचं कौतुक केलं. तसच शिवरायांचे विचार सर्वदूर पोहचावेत, असं आवाहनही जनतेला केलं.
अमित शाहा काय म्हणाले?
अमित शाहा यांनी रायगड किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात जनतेला संबोधित करताना म्हटलं, शिवाजी महाराजांचा फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशात आणि जगात त्यांचं नावलौकीक आहे. मी इथे भाषण द्यायला आलो नाही. तसच कोणंतही राजकारण करायला आलो नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करायला आलो आहे. मला भेट म्हणून शिवमुद्रा देण्यात आली आहे. हे फक्त भारतासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी प्रेरणास्त्रोत आहे.
हे ही वाचा >> M. Com ते पुण्याचा कुख्यात डॉन.. स्वत:ला 'BOSS' म्हणवून घेणारा निलेश घायवळ आहे तरी कोण?
अमित शाहा पुढे म्हणाले, मी खूप वर्षांनंतर इथे आलो आहे. जेव्हा मी सिंहासनाचा आशिर्वाद घेतला. त्यावेळी माझ्या मनात ज्या भावना निर्माण झाल्या. त्यांना शब्दात मांडू शकत नाही. ज्या महापुरुषांनी स्वधर्म आणि स्वराज्यासाठी प्राण अर्पण केले, त्यांच्या सानिध्यात उभं राहणं माझं सौभाग्य आहे. मी अनेक विरांची जीवनगाथा वाचली आहे. पण शिवाजी महाराजांची इच्छाशक्ती, रणनिती आणि जनतेला एकत्रित आणणं, हे अद्वितीय आहे.
हे ही वाचा >> लालबागचा राजाच्या मंडपातील कार्यकर्ता ते ठाकरेंचा विश्वासू शिलेदार.. कोण आहेत सुधीर साळवी?
त्यांनी कोणत्याही वंश परंपरेऐवजी मुघल साम्राज्याची झोप उडवली. त्यांचे मावळे अटक कटक, बंगाल आणि दक्षिणला पोहोचले. तेव्हाच भारतीयांना स्वतंत्रतेचा वास्तविक अनुभव व्हायला लागला. जो स्वत:ला 'अलमगीर' समजत होता, तो महाराष्ट्रात पराभूत झाला आणि त्याची समाधी आज इथेच आहे. हे शिवाजी महाराजांच्या धाडसाचं आणि संकल्पाचा विजय आहे. त्यांचं चरित्र हे फक्त एका क्षेत्रापुरतं मयार्दित नाही, तर हा संपूर्ण भारताचा गौरव आहे. प्रत्येक मुलाने त्याचा इतिहास वाचला पाहिजे.