Vidhan Parishad Election Result: विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, पाहा संपूर्ण यादी
Vidhan Parishad Election 2024 Result: विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून महायुतीच्या नऊही उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव झाला आहे.
ADVERTISEMENT
Vidhan Parishad Election 2024 Result Mahayuti vs MVA: मुंबई: विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने जबरदस्त विजय मिळवत पुन्हा एकदा महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमदेवार हे रिंगणात होते. ज्यापैकी महायुतीचे 9 उमेदवार हे निवडून आले आहेत. तर महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. (vidhan parishad election 2024 result announced 9 candidates of mahayutti won 2 candidates of mahavikas aghadi won see full result)
ADVERTISEMENT
या निवडणुकीत महाविकास आघाडीचा 1 उमेदवार पराभूत झाला आहे. तर दुसरीकडे भाजपचे पाचही उमेदवार हे निश्चित कोटापेक्षा 3 मतं अधिकची मिळवून विजयी झाले. तर अजित पवार यांच्या दोन्ही उमेदवारांनी 5 अधिकचं मतं मिळवून दणदणीत विजय मिळवला. याशिवाय शिंदेच्या शिवसेना उमदेवारांनी देखील अधिकची 3 मतं मिळवली. या निकालाकडे पाहिल्यास प्राथमिक दृष्ट्या काँग्रेसची काही मतं फुटली असल्याचं दिसतं आहे.
या निवडणुकीचा संपूर्ण निकाल आता समोर आला आहे. ज्यामध्ये भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांनी प्रत्येकी 26 मतं घेत अगदी सहज असा विजय मिळवला. त्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने शतप्रतिशत विजय मिळवला.
हे वाचलं का?
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांनीही पहिल्याच फेरीत दणदणीत विजय मिळवला. दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी अजित पवारांकडे आवश्यक मतं नसताना देखील आपल्या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यात अजित पवारांना यश आलं आहे. पहिल्या फेरीतच शिवाजीराव गर्जे यांना 25 आणि राजेश विटेकर यांना 23 मतं मिळाली.
अशाच प्रकारे शिवसेना (शिंदे गट) यांनी देखील विजय मिळवला आहे. त्यांच्या दोन्ही उमेदवारांनी निश्चित कोटापेक्षा जास्तीची मतं मिळवली. कृपाल तुमाने यांना 25 मतं आणि भावना गवळी यांना 24 मतं मिळाली.
ADVERTISEMENT
या निवडणुकीत काँग्रेसकडे 37 मतं होती त्यामुळे त्यांच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांचा विजय निश्चित होता. तर काँग्रेसच्या उरलेल्या मतांवर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी विजय मिळवला आहे. ठाकरेंकडे केवळ 16 मते होती. पण काँग्रेसच्या मतांच्या जोरावर त्यांनी विधानपरिषद निवडणुकीत विजय मिळवला.
ADVERTISEMENT
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पुरस्कृत शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांचा या निवडणुकीत पराभव झाला. त्यांना पहिल्या फेरीत केवळ 12 मतं मिळाली. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीचे 9 आणि महाविकास आघाडीचे 2 उमेदवार हे विधानपरिषदेवर निवडून गेले आहेत.
विधान परिषदेत निवडणुकीचा निकाल
भाजप
1. पंकजा मुंडे - विजयी
2. परिणय फुके - विजयी
3. योगेश टिळेकर - विजयी
4. अमित गोरखे - विजयी
5. सदाभाऊ खोत - विजयी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
1. शिवाजीराव गर्जे - विजयी
2. राजेश विटेकर - विजयी
शिवसेना (शिंदे गट)
1. कृपाल तुमाने - विजयी
2. भावना गवळी - विजयी
काँग्रेस
1. प्रज्ञा सातव - विजयी
शिवसेना (ठाकरे गट)
1. मिलिंद नार्वेकर - विजय
शेकाप (शरद पवारांच्या पक्षाचा पाठिंबा)
1. जयंत पाटील - पराभूत
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT