Vidhan Parishad Election : काँग्रेसची 5 मतं कशी फुटली? अजित पवारांनी काय सांगितलं?
Vidhan Parishad election Result News : विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या राजेश विटेकर यांनी 23 मतं मिळवून विजय मिळवला. तर शिवाजीराव गर्जे यांनीही 24 मतं मिळवून आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार विजयी
शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे पहिल्या पसंतीच्या मतांनी विजय
अजित पवारांच्या दोन्ही उमेदवारांना 47 मतं पडली
Vidhan Parishad Election Result, Ajit Pawar : विधान परिषद निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे पहिल्या पसंतीच्या मतांनी विजय झाले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे 40 आमदारांचं संख्याबळ होतं आणि विजयी होण्यासाठी 23 मतांचा कोटा होता. त्यानुसार अजित पवारांच्या दोन्ही उमेदवारांना 47 मतं पडली होती. त्यामुळे अजित पवारांनी 5 मतांची जुळवाजुळव कशी केली आणि कुणाची मतं फोडली? हे जाणून घेऊयात. (vidhan parishad election result congress 5 mla cross vote ajit pawar reaction ncp shivaji rao garje and rajesh vitekar won election)
विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या राजेश विटेकर यांनी 23 मतं मिळवून विजय मिळवला. तर शिवाजीराव गर्जे यांनीही 24 मतं मिळवून आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे. यामध्ये अजित पवारांना अतिरिक्त मतं मिळाल्यामुळेच त्यांच्या उमेदवाराचा विजय झाला. ही अतिरिक्त मतं काँग्रेसची असल्याची सुत्रांची माहिती आहे. यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Vidhan Parishad Election Result: विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, पाहा संपूर्ण यादी
विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार माध्यमांशी बोलत होते. यावेळी अतिरिक्त मतांवर बोलताना अजित पवार म्हणाले की, आम्हाला ज्यांनी शब्द दिला,त्यांनी आम्हाला मतदान केलं आहे. तसेच अदृष्य शक्ती बिक्ती काही नसते. प्रयत्न करायचे असतात. तुम्हाला आमदारांशी चांगले संबंध ठेवायचे असतात. तुमचे संबंध कसे आहेत, त्याच्यावरती त्या गोष्टी अवलंबून असतात, असे अजित पवार यांनी सांगितले आहे. आमच्या सगळ्या सहकारी मित्रांनी चांगले काम केले आहे. असे या निकालावरून दिसते. त्यामुळे सगळ्यांचे आभार मानतो, असे देखील अजित पवार म्हणाले आहेत.
विधान परिषद निवडणुकीकडे सगळ्या जनतेचं आणि महाराष्ट्राचं लक्ष होतं. वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरवल्या जात होत्या. पण एका गोष्टीचं समाधान आहे. आमच्याकडे 42 मतं होती, पण त्यापेक्षा अधिकची मतं आमदारांनी शिवाजीराव गर्जे आणि योगेश विटेकरांना दिली आहे. त्या सर्व आमदारांचे मी आभार मानतो. तसेच महायुतीच्या उमेदवारांना मतदान करणाऱ्या आमदारांचे मी आभार मानतो,असे अजित पवार यांनी सांगितले आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा : Vidhan Parishad Election: दोन वर्षांपूर्वी 'याच' निवडणुकीने महाराष्ट्रात झालेला राजकीय भूकंप, आज पुन्हा...
या प्रकरणात वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होत होत्या हे फुटणार ते फुटणार अशाप्रकारच्या बातम्या येत होत्या. पण शिंदे, फडणवीस आणि आम्ही एकत्र बसून शिंदेंची मतं त्यांनी सांभाळायची, भाजपची मतं त्यांनी सांभाळायची आणि राष्ट्रवादीची मतं राष्ट्रवादीने सांभाळायची असं आमचं ठरलं होतं, असे अजित पवारांनी सांगितले आहे.
या निवडणुकीतून आमची महायुतीची एकी दिसून आली आहे. त्यामुळे हीच एकी विधानसभेत दिसून येईल, असा विश्वास देखील अजित पवारांनी व्यक्त केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT