Team India Head Coach Update: राहुल द्रविडबाबत मोठी बातमी, मुख्य प्रशिक्षक राहणार की नाही?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

Team India Head Coach Update: राहुल द्रविडबाबत मोठी बातमी, मुख्य प्रशिक्षक राहणार की नाही?
Team India Head Coach Update: राहुल द्रविडबाबत मोठी बातमी, मुख्य प्रशिक्षक राहणार की नाही?
social share
google news

Rahul Dravid remain Team India Head Coach: मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकावर सुरू असलेला सस्पेन्स अखेर संपवला आहे. विश्वचषक 2023 पर्यंत टीम इंडियाचे प्रशिक्षक असलेले राहुल द्रविड हेच यापुढेही टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहतील. द्रविडसोबतच टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफचा देखील करार वाढवण्यात आला आहे. (rahul dravid will remain the head coach of team india contract of support staff also increased bcci took the final decision)

ADVERTISEMENT

अलीकडेच, ICC क्रिकेट चषक 2023 नंतर राहुल द्रविडचा करार संपला. त्याचा कालावधी संपल्यानंतर बीसीसीआयने राहुल द्रविडशी चर्चा केली होती. त्यानंतर राहुल द्रविडने कार्यकाळ वाढवण्यास सहमती दर्शवली होती. यादरम्यान बीसीसीआयने द्रविड राहुल द्रविडचे कौतुक केले. तसेच बोर्डाने एनसीएचे प्रमुख आणि स्टँड-इन मुख्य प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मणचे देखील कौतुक केले आहे.

हे ही वाचा>> Virat Kohli : किंग कोहली ODI-T20 क्रिकेटमधून घेणार निवृत्ती? ब्रेकच्या निर्णयाने खळबळ

हे वाचलं का?

बीसीसीआयचे अध्यक्ष श्री रॉजर बिन्नी म्हणाले, “राहुल द्रविडची दूरदृष्टी आणि कठोर परिश्रम हे टीम इंडियाच्या यशाचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडकडे केवळ आव्हाने स्वीकारण्याचीच नाही तर प्रगती करण्याची क्षमता आहे. भारतीय संघाची कामगिरी त्यांच्या धोरणात्मक मार्गदर्शनाचा पुरावा आहे. त्याने मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर स्वीकारली याचा मला आनंद आहे.” असं बिन्नी यावेळी म्हणाले.

हे ही वाचा>> BCCI ची मोठी ऑफर नेहराने धुडकारली! राहुल द्रविडला पुन्हा मुख्य प्रशिक्षकपदाची संधी

मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यावर राहुल द्रविड काय म्हणाले?

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ वाढविल्यानंतर राहुल द्रविड म्हणाले की, “टीम इंडियासोबतची गेली दोन वर्षे अविस्मरणीय राहिली आहेत. आम्ही अनेक चढ-उतार पाहिले आहेत आणि या काळात संघात पाठिंबा आणि सौहार्द आहे. आम्ही ड्रेसिंग रूममध्ये जी संस्कृती प्रस्थापित केली आहे. त्याचा मला खरोखर अभिमान वाटतो. आमच्या संघाकडे असलेली कौशल्ये आणि प्रतिभा अभूतपूर्व आहे.”

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT