Arjun Tendulkar: क्रिकेटचा 'अर्जुन'! भावानं मैदान गाजवलं, एकाच सामन्यात घेतल्या 9 विकेट्स, Video तुफान व्हायरल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Arjun Tendukar 9 Wickets Bowling Video
Arjun Tendukar 9 Wickets Bowling Video
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अर्जुन तेंडुलकरने एकाच सामन्यात 9 विकेट्स घेऊन इतिहास रचला

point

अर्जुन तेंडुलकरच्या भेदक गोलंदाजीचा व्हिडीओ तुफान व्हायरल

point

अर्जुनने वेगवान मारा करून भल्या भल्या फलंदाजांना तंबूत पाठवलं

Arjun Tendulkar Takes 9 Wickets Video Viral : कर्नाटकात सुरू असलेल्या डॉक्टर के थिमप्पिया मेमोरियल स्पर्धेचा थरार सुरु असून एक जबरदस्त व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आपल्या वेगवान गोलंदीजानं भल्या भल्या फलंदाजांना तंबूत पाठवणारा अर्जून पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. अर्जुनच्या भेदक गोलंदाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. (A tremendous video of the Dr. K. Thimappiya Memorial Competition being held in Karnataka has gone viral. Master Blaster Sachin Tendulkar's son Arjun Tendulkar has performed historic feats)

गोवाकडून खेळताना कर्नाटक संघाविरुद्ध अर्जुनने भेदक मारा करून प्रतिस्पर्धई संघाच्या फलंदाजांना स्वस्तात माघारी पाठवलं. या रेड बॉल क्रिकेट स्पर्धेत अर्जुनने उल्लेखनीय कामगिरी केली. अर्जुनच्या चमकदार कामगिरीमुळं गोवा संघाला एक डावा आणि 189 धावांनी विजय मिळवणं शक्य झालं. अर्जुन सध्या गोवा क्रिकेट असोसिएशनकडून खेळत आहे. कर्नाटक विरुद्ध झालेल्या सामन्यात अर्जुनने 9 विकेट्स घेऊन धमाका केला.

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो 'या' गोष्टी अजिबात विसरू नका! झटपट जमा होतील 4500 रुपये

अर्जुनने पहिल्या इनिंगमध्ये 5 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 4 विकेट्स घेऊन कर्नाटक संघाची दाणादाण उडवली. अर्जुन तेंडुलकरने दोन इनिंगमध्ये 26.3 षटकांमध्ये 87 धावा देऊन 9 विकेट्स घेतल्या. पहिल्या इनिंगमध्ये कर्नाटकचा संघ 36.5 षटकात 103 धावांवरच सर्वबाद झाला. यामध्ये अर्जुनने 13 षटकांमध्ये 41 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या. त्यानंतर प्रत्युत्तरात गोवा संघाच्या अभिनव तेजराणा (109) धावांची शतकी खेळी केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

इथे पाहा व्हिडीओ

 

तर मंथन खुटकरच्या 69 धावांच्या जोरावर 413 धावांचा डोंगर रचला. दुसऱ्या इनिंगमध्ये केएससीए इलेव्हन संघ 30.4 षटकात 121 धावांवर बाद झाला. अर्जुनने 13.3 षटकात 46 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. अर्जुनने आतापर्यंत सीनियर लेव्हलच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये 49 सामने खेळले असून 68 विकेट्स घेतल्या आहेत. प्रथम श्रेणीच्या 13 सामन्यांमध्ये त्याने 21 विकेट्स घेतल्या आहेत. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> निपाह व्हायरसमुळे एकाचा मृत्यू! Nipah Virus किती धोकादायक? लक्षण आणि उपाय काय?

अर्जुन तेंडुलकरने IPL मध्ये केलंय पदार्पण

क्रिकेटचा देव म्हणून ख्याती असलेल्या सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने 2023 मध्ये आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी पदार्पण केलं. तेव्हापासून आतापर्यंत अर्जुनने 5 सामने खेळले आहेत. यामध्ये अर्जुनला 3 विकेट्स घेण्यात यश मिळालं. आयपीएल 2025 आधी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स अर्जुनला रिलीज करू शकते. लिलावात दुसरे संघ अर्जुनला विकत घेऊ शकतात. 
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT