Manu Bhaker : मनू भाकरने मौन सोडलं, 'खेलरत्न' पुरस्काराच्या मुद्दयावर बोलली; काय आहे संपूर्ण प्रकरण?
मनू भाकरला खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन मिळालेलं नाही अशी चर्चा सुरू झाली होती. मनू भाकरच्या वडिलांनीही या संपूर्ण प्रकरणावर एक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे या प्रकरणाची आणखीच चर्चा वाढली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

Manu Bhaker
भारताची स्टार नेमबाज आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी मनू भाकर सध्या चर्चेत आहे. 22 वर्षीय मनू भाकरने खेलरत्न पुरस्काराच्या मुद्द्यावर आता स्पष्टपणे आपलं मत व्यक्त केलं आहे. या संपूर्ण प्रकरणावर मनू भाकरने आता सोशल मीडियावर पोस्ट करत भूमिका स्पष्ट केली आहे.
मनू भाकरला खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन मिळालेलं नाही अशी चर्चा सुरू झाली होती. मनू भाकरच्या वडिलांनीही या संपूर्ण प्रकरणावर एक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे या प्रकरणाची आणखीच चर्चा वाढली.
हे ही वाचा >>Alexa, Siri, Google Map अशा सगळ्याच ठिकाणी महिलांचाच आवाज का? 'हे' आहे खरं कारण...
आता खुद्द मनू भाकरने यावर खुलासा केला आहे. मनू भाकरने सध्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, आपलं पहिलं लक्ष्य देशासाठी पदक जिंकणं आहे, एखादा पूरस्कार मिळवणं नाही. मनूने सांगितलं की, पुरस्कार ही प्रेरणा असू शकते, पण ध्येय नाही.
स्टार नेमबाज मनूने आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलं?
मनू भाकरने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'माझ्या खेलरत्न पुरस्काराच्या नामांकनाबाबत बरीच चर्चा होतेय. त्यावर मी एवढंच म्हणेल की, एक खेळाडू म्हणून माझं काम देशासाठी खेळणं आणि चांगली कामगिरी करणं एवढंच आहे. पुरस्कार किंवा एखादा सन्मान मला प्रोत्साहन देतो, पण ते माझं ध्येय नसतं.
मला असं वाटतं की नामांकनाच्या वेळी माझ्याकडून चूक झाली होती, जी मी सुधारली आहे. मला पुरस्कार मिळो किंवा न मिळो, मी देशासाठी जास्तीत जास्त पदकं जिंकण्याचा प्रयत्न करत राहीन. मी सर्वांना विनंती करते की, या विषयावर आता बोलू नका.
हे ही वाचा >> Allu Arjun Stampede Case : अल्लू अर्जून पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये, आज चौकशी होणार? हैदराबादमध्ये नेमकं काय घडतंय?
दरम्यान, मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्टलच्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं होतं. यानंतर तिने सरबज्योत सिंगसोबत त्याच ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं होतं.
नेमबाजीत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी ती पहिली भारतीय आहे. मनू आता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून, इंस्टाग्रामवर तिचे जवळपास 20 लाख फॉलोअर्स आहेत. एका ऑलिम्पिकमध्ये 3 पदके जिंकणारी एकमेव भारतीय बनून मनू इतिहास रचण्याच्या मार्गावर होती, परंतु ती महिलांच्या 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत कमी फरकाने हुकली.