Asia Cup 2023: आशिया चषकासाठी टीम इंडियाची घोषणा, ‘या’ 17 जणांना स्थान
BCCI ने आशिया कप 2023 साठी आपला 17 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या स्पर्धेतील इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना हे आकर्षण आहे. त्यामुळे या सामन्यात कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
Indian Squad for Asia Cup 2023: नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आशिया कप 2023 साठी आपला संघ जाहीर केला आहे. अजित आगरकर यांनी 21 ऑगस्ट (सोमवार) रोजी दिल्लीत संघाची घोषणा केली. यावेळी रोहित शर्माही उपस्थित होता. 17 सदस्यीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे असेल. केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर भारतीय संघात परतले आहेत. तर युवा फलंदाज तिलक वर्मालाही संघात संधी मिळाली आहे. पण संजू सॅमसनला संघात स्थान मिळालेले नाही. हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात होते, मात्र त्याला उपकर्णधारपदावर कायम ठेवण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2 सप्टेंबरला आशिया चषकात पहिला सामना खेळणार आहे. हा सामना पाकिस्तान विरुद्ध श्रीलंकेतील कॅंडी येथे होणार आहे. यानंतर भारताचा दुसरा गट सामना 4 सप्टेंबर रोजी नेपाळशी होणार आहे. आशिया चषक स्पर्धेत भारत, पाकिस्तान आणि नेपाळ एकाच गट-अ मध्ये आहेत. आशिया कप पाकिस्तानच्या यजमानपदावर हायब्रिड मॉडेलच्या आधारे खेळवला जात आहे.
आशिया चषक स्पर्धेसाठी भारताचा 17 सदस्यीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव , ईशान किशन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Sana Khan Murder : सना, सेक्स्टॉर्शन आणि ग्राहकांसोबत संबंध; पोलिसांच्या हाती स्फोटक माहिती
बीसीसीआयच्या यादीनुसार, रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन आणि तिलक वर्मा या आठ विशेषज्ञ फलंदाजांना भारतीय संघात स्थान मिळाले आहे. इशान आणि केएल राहुल यांपैकी एक विकेटकीपिंग करण्याची शक्यता आहे.
संघात हे तीन अष्टपैलू खेळाडू
आशिया चषकात उपकर्णधार हार्दिक पंड्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. हार्दिकला बॅटने उत्तम खेळ दाखवावा लागेल, तर गोलंदाजीतही भारतीय चाहत्यांना या स्टार खेळाडूकडून दमदार खेळाची अपेक्षा असेल. रवींद्र जडेजासोबत अक्षर पटेललाही अष्टपैलू म्हणून भारतीय संघात स्थान मिळाले आहे. अक्षरने चेंडूसोबतच बॅटनेही आपली क्षमता अनेक वेळा सिद्ध केली आहे.
ADVERTISEMENT
पाच वेगवान गोलंदाज आणि एक फिरकीपटू
वेगवान गोलंदाजीत पाच विशेषज्ञ वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराह दुखापतीतून सावरला असून त्याचे संघातील स्थान निश्चित झाले आहे. तर मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे देखील वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतून विश्रांती घेतल्यानंतर आशिया कपमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील. त्याचबरोबर शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा यांनाही संधी मिळाली आहे. चायनामन कुलदीप यादव हा स्पेशालिस्ट फिरकीपटू म्हणून संघाचा भाग आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Chandrayaan-3 : जे कुणाला जमलं नाही ते भारताने केलं, चंद्राचे ‘ते’ दुर्मिळ फोटो ISRO ने केले ट्वीट!
आशिया कपमध्ये फायनलसह एकूण 13 सामने आहेत. यातील 4 सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत. तर अंतिम सामन्यासह उर्वरित 9 सामने श्रीलंकेत खेळवले जातील. भारतीय संघाने अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला तर ते या स्पर्धेत एकूण 6 सामने खेळतील. यावेळी आशिया चषक एकदिवसीय फॉर्मेटमध्ये होत आहे. अशा स्थितीत विश्वचषकाच्या दृष्टीने इतके सामने खेळणे संघासाठी चांगले ठरेल.
आशिया कपमध्ये टीम इंडियाचा दबदबा
आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. आतापर्यंतच्या इतिहासात आशिया चषकाचे 15 हंगाम झाले आहेत, ज्यामध्ये भारतीय संघाने सर्वाधिक 7 वेळा (1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016, 2018) विजेतेपद पटकावले आहे. तर श्रीलंका दुसऱ्या क्रमांकावर आहे, जो 6 वेळा (1986, 1997, 2004, 2008, 2014, 2022) चॅम्पियन ठरला आहे. पाकिस्तानला केवळ दोनदा (2000, 2012) विजेतेपद मिळवता आले आहे.
आशिया कप वेळापत्रक:
30 ऑगस्ट: पाकिस्तान विरुद्ध नेपाळ – मुलतान
31 ऑगस्ट: बांगलादेश विरुद्ध श्रीलंका – कॅंडी
2 सप्टेंबर: भारत विरुद्ध पाकिस्तान – कॅंडी
3 सप्टेंबर: बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान – लाहोर
4 सप्टेंबर: भारत विरुद्ध नेपाळ – कॅंडी
5 सप्टेंबर: श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान – लाहोर
६ सप्टेंबर: A1 Vs B2 – लाहोर
९ सप्टेंबर: B1 वि B2 – कोलंबो (श्रीलंका विरुद्ध बांगलादेश असू शकते)
10 सप्टेंबर: A1 वि A2 – कोलंबो (भारत विरुद्ध पाकिस्तान असू शकते)
12 सप्टेंबर: A2 वि B1 – कोलंबो
14 सप्टेंबर: A1 विरुद्ध B1 – कोलंबो
15 सप्टेंबर: A2 विरुद्ध B2 – कोलंबो
17 सप्टेंबर: अंतिम – कोलंबो
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT