Asia Cup Viral Video : हातात ड्रिंक्स आणि कांगारू उड्या, विराट असा धावला की…

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

virat kohli carry drinks for team india funny video viral ind vs ban asia cup 2023
virat kohli carry drinks for team india funny video viral ind vs ban asia cup 2023
social share
google news

Virat Kohli Turns Water Boy : आशिया कपच्या सुपर 4 सामन्यात बांग्लादेशने 6 धावांनी टीम इंडियाचा पराभव केला. मात्र या पराभवाचा टीम इंडियाला फारसं काही नुकसान होणार नाही. कारण टीम इंडिया आधीच फायनलमध्ये पोहोचली आहे.या सामन्यात टीम इंडियाचे सिनीअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. मात्र ही विश्रांती देऊन देखील विराट कोहली चर्चेत आला आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. त्यामुळे नेमकं आता विराट कोहलीने काय केलंय, ते जाणून घेऊयात. (virat kohli carry drinks for team india funny video viral ind vs ban asia cup 2023)

ADVERTISEMENT

बांग्लादेशविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माने विराट कोहली, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव यांसारख्या खेळाडूंना विश्रांती दिली होती. या खेळाडूंच्या जागी इतर नवख्या खेळाडूंना संधी देण्यात आली होती. या सामन्यात विराटला विश्रांती देऊन देखील तो चर्चेत आला आला आहे.

हे ही वाचा :Cabinet Meeting: छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळ बैठक, शिंदे सरकारने घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

खरं तर या सामन्यात बांग्लादेशने प्रथम फलंदाजी केली होती. यावेळेस गोलंदाजी करताना टीम इंडियाने दुसरा विकेट घेतला होता. या विकेटनंतर ड्रिंक्स ब्रेक झाला. त्यामुळे ड्रिंक्स घेऊन विराट कोहली, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव मैदानात आले होते. यावेळी मैदातात येताना विराट कोहली एका वेगळ्यात शैलीत धावताना दिसला. त्याची ही धावण्याची शैली पाहून तु्म्हाला देखील हसू आवरणार नाही, इतक्या मजेशीर पद्धतीने मैदानात धावताना तो दिसला होता. यासोबतच मैदानातून परतताना देखील तो त्याच शैलीत धावत होता. या दरम्यानचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हे वाचलं का?

दरम्यान विराटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी तुफान लाईक्स कमेंट केल्या आहेत. विराटने खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी अशी कृती केल्याचे बोलले जात आहे. यासोबत 77 शतक ठोकून सुद्धा विराट वॉटर बॉय बनल्याचे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. विराटच्या या व्हिडिओवर 2 लाखाहून अधिक व्हूज आले आहेत.

ADVERTISEMENT

दरम्यान प्रेमादास स्टेडिअमवर रंगलेल्या सामन्यात बांग्लादेशने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट गमावून 265 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या टीम इंडिया 259 धावावर ऑल आऊट झाली होती. त्यामुळे भारताचा 6 धावांनी पराभव केला होता.

ADVERTISEMENT

हे ही वाचा :Sanatan Controversy : सनातन धर्मावरून वाद पेटला, बाबा रामदेव भडकले; ‘सनातनला शिव्या…’,

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT