गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या वेगवेगळ्या घटनांमुळे पुणे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्न उपस्थित होत असतानातच, नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यातल्या अत्यंत गजबजलेल्या ठिकाणांपैकी एक असलेल्या स्वारगेट बस स्थानकात थेट शिवशाही बसमध्येच एका 26 वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, पोलिसांची पथकं आरोपीच्या मागावर आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Pune : "शरीरसुखाची मागणी पूर्ण न केल्यानं मला निलंबित केलं...", PMPL महिला कंडक्टरचा कार्यालयातच आत्मदहनाचा प्रयत्न
आज पहाटे 5:30 वाजता पुण्यातील एसटी स्टँडवर ही घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपीचं नाव दत्तात्रय रामदास गाडे असल्याचं समोर आलं आहे. आरोपीवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. 26 वर्षांची तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने निघाली होती, स्वारगेट एसटी स्टँड परिसरात आल्यानंतर एका ठिकाणी ती थांबली असता एका अनोळखी इसमाने तिला तिची एसटी दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचं सांगितलं.
माझी एसटी याच ठिकाणी थांबते, तिकडे जाणार नाही असं त्या मुलीने त्या इसमाला सांगितलं. मात्र एकट्या मुलीचा फायदा घेत त्या तरुणाने तिला बोलण्यात अडकवलं. स्वारगेट एसटी स्टँड परिसरात असलेल्या एका अंधाराच्या ठिकाणी एक शिवशाही बस उभी होती. या ठिकाणी ती मुलगी गेल्यानंतर तिने ही एसटी तर बंद आहे असं देखील सांगितलं. त्यावर "तू टॉर्च लावून आत मध्ये जा.. हीच एसटी काही वेळात फलटणला निघेल" असं या नराधमाने तिला सांगितलं. नंतर आरोपी स्वतः तिच्यासोबत बसमध्ये शिरला. त्यानं तिच्यावर जबरदस्ती केली आणि त्यानंतर तो तिथून पसार झाला.
हे ही वाचा >>Prashant Koratkar : बडे नेते, अधिकाऱ्यांसोबत फोटो ते महागड्या गाड्या... कोण आहे प्रशांत कोरटकर?
दरम्यान, घडलेला संपूर्ण प्रकार या मुलीने पोलिसांना सांगितलेला असून, पोलिसांची विविध पथकं आरोपीचा शोध घेत आहेत. या प्रकरणातला आरोपी हा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील असून, त्याच्यावर आधीही गुन्हे दाखल असल्याचीमाहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
