'आमच्या समोर 5 जणांना गोळ्या घातल्या, आम्ही घाबरून अजान म्हटली...', पुण्याच्या आसावरी जगदाळेंनी सांगितला थरकाप उडवणार थरार

पहलगाम दहशतवादी हल्ल्याती प्रत्यक्षदर्शी असलेल्या पुण्यातील आसावरी जगदाळे यांनी नेमकी घटना कशी घडली याबाबतची माहिती सांगितली आहे.

पुण्याच्या आसावरी जगदाळेंनी सांगितला थरकाप उडवणार थरार

पुण्याच्या आसावरी जगदाळेंनी सांगितला थरकाप उडवणार थरार

अभिजीत करंडे

• 08:44 PM • 23 Apr 2025

follow google news

पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे काल (22 एप्रिल) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये पुण्याच्या संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ही नेमकी घटना कशी घडली आणि त्यावेळी तिथे दहशतवाद्यांनी काय-काय केलं या सगळ्याची माहिती संतोष देशमुखांच्या कुटुंबातील असलेल्या आसावरी जगदाळे यांनी मुंबई Tak शी बोलताना सांगितलं. 

हे वाचलं का?

'तुम्ही मोदींना डोक्यावर बसवून ठेवलंय..., असं म्हणाले अन् माझ्यासमोर 5 जणांना गोळ्या घातल्या'

आसावरी जगदाळे: आम्ही फिरायला आलो होतो. बैसरन व्हॅली परिसरात.. पूर्ण मोकळा मैदानी परिसर आहे हा. तिथेच दहशतवादी आले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. गोळीबार करताना त्यांनी जेवढेही हिंदू लोकं होते त्या सगळ्यांना पकडून धमकी दिली की, तुम्ही अजान म्हणा. जर नाही म्हणालात तर गोळ्या मारू. 

त्यावेळी तिथे माझे काका आणि वडीलही तिथेच होते. त्या दोघांनाही त्यांनी गोळ्या मारल्या. मोदींचं नाव ते आम्हाला बोलत होते की, तुम्ही मोदींना डोक्यावर बसवून ठेवलंय. तुमच्यामुळे आमचा धर्म धोक्यात आहे. असं ते बोलत होते. 

आम्ही महाराष्ट्रातील पुण्यातून आहोत. माझ्या बाबा आणि काकांना गोळ्या लागल्या आहेत. आम्ही आता पहलगाममध्ये आलो आहोत. मी आई आणि काकीसोबत आहे. आम्हाला काहीही अपडेट नाहीत. 3.30-4.00 वाजेच्या दरम्यान हल्ला झाला. तेव्हापासून आम्हाला काही अपडेट मिळालं नाही.

माझ्यासमोरच हे सगळं घडलं. आम्ही सगळे एका टेंटच्या मागे लपलेलो. ते तिथे आले आणि त्यांनी माझ्या वडिलांना तिथून उचललं आणि गोळ्या मारल्या. माझे काका खाली झोपले होते त्यांना गोळ्या मारल्या. आमच्या बाजूला एक कुटुंब होतं. त्यांच्यामधील 2 लोकांना गोळ्या मारल्या. आम्हाला सांगितलं की, अजान म्हणा नाहीतर आम्ही तुम्हालाही गोळ्या मारू. 

त्यांनी कोणत्याही महिलेला किंवा लहान मुलांना मारलं नाही. त्यांनी फक्त आणि फक्त पुरुषांना मारलं. तिथे काही स्थानिक काश्मिरी मुस्लीम लोकंही होते. पण त्यांना देखील दहशतवाद्यांनी धमकावलं होतं. ते अजान म्हणत होते. त्यांचं ऐकून आम्ही देखील अजान म्हणू लागलो. कारण त्यांनी आम्हाला गोळ्या मारू नये. 

पहिले त्यांनी माझ्या वडील आणि काकांना गोळ्या मारल्या. त्यानंतर आम्ही तिथून पळून आलो. त्यांना आम्हाला सोडून पळून यावं लागलं.

तिथे जे स्थानिक घोडेस्वार असतात त्यांनी आम्हाला मदत केली. त्यामुळे आम्ही त्या परिसरातून बाहेर पडू शकलो. 30 पेक्षा जास्त लोकं तिथे जखमी झाले होते. आमच्या समोर त्यांनी 5 लोकांना गोळ्या मारल्या होत्या. त्यात माझे वडील आणि काकांचा समावेश आहे. 

मी जोडपं पाहिलं.. ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं असावं त्यांना गोळी मारलेलं मी पाहिलं. एक मॅडम बसल्या होत्या त्यांच्या पतीला गोळी मारलेली. त्यांची मुलगी खूप छोटी होती. 

आम्ही ज्या परिसरात होतो तेव्हा दहशतवादी हे पोलीस किंवा लष्कराच्या जवानांचे कपडे घालून आमच्या दिशेने आलेले. त्यांनी सुरुवातीला आम्हाला धमकावलं. 26/11 हल्ला कसा झाला होता. तसाच हल्ला त्यांनी यावेळी केला. गोळ्या मारून ते नंतर पळूनही गेले.

त्यांनी स्थानिकांना गोळ्या नाही मारल्या. जे मुस्लीम नाहीत, हिंदू आहेत त्यांनाच गोळ्या मारण्यात आल्या. धर्म विचारुनच गोळ्या मारल्या. तुम्ही हिंदू आहात ना.. तुम्ही मोदींना डोक्यावर चढवून ठेवलंय. अजान म्हणा.. नाही येत अजान म्हणता.. तर गोळी मारत होते. माझ्या वडिलांना माझ्यासमोर तीन गोळ्या मारल्या सर.. 

अशी सगळी घटना आसावरी जगदाळे यांनी मुंबई Tak सोबत फोनवरून बोलताना सांगितली.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या इतर काही बातम्या>>

  1. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी बॅगमध्ये काय आणलेलं? समोर आली मोठी माहिती

  2. TRF: 'मोदी को जाके बताओ...', असं म्हणत पर्यटकांना ठार मारणारे नराधम कोणत्या संघटनेचे?

  3. पहलगाम दहशतवादी हल्ल्याची 'ही' आहे Inside स्टोरी, तुम्हीही जाल हादरून!

  4. Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांची संपूर्ण यादीच आली समोर!

  5. मुलाची 10वीची परीक्षा संपली म्हणून काश्मीरला नेलं, पण... डोंबिवलीच्या हेमंत जोशींना बायको-मुलासमोरच संपवलं!

  6. पहलगाममध्ये 28 निष्पापांचा घेतला जीव, 'हा' नराधम आहे मास्टरमाईंड... त्याच्यावर पाक लष्कर उधळतं फुलं!

  7. आधी पतीला मारलं! नंतर पत्नीला म्हणाले, 'मोदीला जाऊन सांग..'; दहशतवाद्यांच्या हल्ल्यापूर्वीचा Video आला समोर

  8. Pahalgam Attack: 28 निष्पापांना ठार करणारे हेच ते नराधम... फोटो आणि स्केच आलं समोर

  9. 'तो' होता Navy अधिकारी.. नुकतंच झालेलं लग्न, पत्नीसोबत आलेला हनिमूनला अन्...

  10. Terror Attack: पतीच्या मृतदेहाशेजारी पत्नी अन्... 'हा' फोटो तुमचं काळीज टाकेल पिळवटून!

 

    follow whatsapp