Pahalgam Terror Attack : अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला. यामध्ये एक नेव्ही, एक एयरफोर्स आणि एका आयबी अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला आहे. हे सर्व जण पहलगाममध्ये पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गेले होते. परंतु, येथील डोंगरभागात लपलेल्या दहशतवाद्यांनी या पर्यटकांना निशाणा बनवला आणि त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला.
ADVERTISEMENT
दहशतवाद्यांनी पहलगामच्या बैसरनमध्येच हल्ला का केला?
दहशतवाद्यांनी हल्ला करण्याआधी या परिसराची रेकी केली होती. हा परिसरत शांत आणि निसर्गरम्य सौंदर्यात लपलेला आहे. या परिसरात पोहोचवण्यासाठी कमीत कमी एक तासाचा कालावधी लागतो. या दुर्गम भागात सुरक्षेसाठी कोणताही उपाययोजना नव्हती. पर्यटकांची वर्दळ असतानाही या भागात कोणत्याही प्रकारची सुरक्षेची योजना नव्हती. जवळपास सहा किलोमीटर अंतरापर्यंत एकही पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी उपलब्ध नव्हता, अशी माहिती समोर आलीय.
हे ही वाचा >> प्रत्येक भारतीयाला सतावणारा प्रश्न... पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला तिथे Army का नव्हती?
हल्ला केल्यानंतर पळून जाण्यासठी पर्यायी मार्ग
मॅपनुसार बैरसन झाडी पाहिली तर, बैसरनचा हिरवागार मैदान पहलगाम शहराच्या दक्षिण-पूर्व भागात आहे. या परिसरात नदी, घनदाट जंगल पसरलेला आहे. या भागात काही ठिकाणी मोटर वाहन जाऊ शकत नाही. डोंगरभागात धोकादायक रस्ता आहे. पर्यटकांकडून येजा करताना काही चूक झाली तर ते दरीत पडू शकतात. पहलगाममधून पर्यटक पायी आणि घोडेस्वारी करून गवताच्या मैदानापर्यंत पोहोचतात. याशिवाय एटीवी (ऑल टेरेन व्हेहिकलचाही) वापर केला जाऊ शकतो.
पहलगामवरून बैरसनला पोहोचायला किती वेळ लागतो?
पहलगामवरून बैसरनला पोहोचायला जवळपास एक तासांची वेळ लागते. रस्त्यात छोटा मोठा ब्रेक घेण्यासाठी कोणतीही सुविधा नाहीय. गवताचं मैदान चारही बाजूंनी पसरलेलं आहे. यामुळे तिथे पोहोचायला अडचणी निर्माण होतात. बैसरनमध्ये स्टॉल चालवणारे स्थानिक लोक बाईकच्या माध्यमातून प्रवास करतात.
हे ही वाचा >> प्रत्येक भारतीयाला सतावणारा प्रश्न... पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला तिथे Army का नव्हती?
ADVERTISEMENT
