आधी पतीला मारलं! नंतर पत्नीला म्हणाले, 'मोदीला जाऊन सांग..'; दहशतवाद्यांच्या हल्ल्यापूर्वीचा Video आला समोर

Pahalgam Terror Attack Viral Video : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप 28 नागरिकांचा बळी गेला. तर 17 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Pahalgam Terrorist Attack Viral Video

Pahalgam Terrorist Attack Viral Video

मुंबई तक

23 Apr 2025 (अपडेटेड: 23 Apr 2025, 05:09 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ आला समोर

point

पती मंजूनाथचा मृत्यू झाल्यानंतर पत्नी पल्लवीच्या अश्रूंचा फुटला बांध

point

तो व्हायरल व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील

Pahalgam Terror Attack Viral Video : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप 28 नागरिकांचा बळी गेला. तर 17 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यातील मंजूनाथ यांचाही या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. त्यावेळी त्यांची पत्नी पल्लवी दहशतवाद्यांना म्हणाली मला का सोडताय, मलाही मारून टाका..यावर दहशतवादी म्हणाले, महिलांना आणि मुलांना मारणार नाही. जा मोदीला जाऊन सांग..

हे वाचलं का?

पतीचा मृत्यू झाल्यानंतर पल्लवीधा मोठा धक्का बसला. पल्लवीच्या अश्रूंचा बांध फुटल्यानंतर ती रडत रडत म्हणाली, आम्ही तीन लोक होते. मी, माझा पती आणि मुलगा. आम्ही सर्व काश्मीर फिरायला गेलो होतो. दुपारी अडीच वाजताची वेळ असेल, माझ्या डोळ्यांसमोरच माझ्या पतीला गोळी मारली. मी म्हटलं, मलाही मारा. तेव्हा एक दहशतवादी म्हणाला, तुम्हाला मारणार नाही. मोदीला जाऊन सांगा. हे आताही एक वाईट स्वप्नाप्रमाणे वाटत आहे. त्यांच्या निशाण्यावर हिंदू होते.

हे ही वाचा >> पहलगाममध्ये 28 निष्पापांचा घेतला जीव, 'हा' नराधम आहे मास्टरमाईंड... त्याच्यावर पाक लष्कर उधळतं फुलं!

हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ आला समोर

"मी मंजूनाथ शिवमोगा कर्नाटकहून. आम्ही इंडिया ट्रॅव्हल स्टोरमध्ये बुकिंग करून काश्मीरमध्ये पर्यटनाला आलो आहोत. आता आमचा काश्मीर टूरचा दुसरा दिवस आहे. पल्लवी म्हणते, काल आम्ही बोट हाऊसमध्ये थांबलो होतो. बोट हाऊस खूप चांगला होता. आता आम्ही शिकारा राईड करत आहोत मोहम्मद रफीक जी..आमची टूर ऑर्गनाईज केली आहे काजल ठाकूर जी. खूप चांगलं वाटलं. थँक्यू काजल मॅम..", असं या व्हिडीओत म्हटलं आहे.

इथे झाला हल्ला

मार्च महिन्यात बर्फ वितळल्यानंतर अनेक ठिकाणाहून पर्यटक काश्मीरला पोहोचले होते. पहलगामच्या निसर्गरम्य झाडीत पर्यटक फेरफटका मारण्यासाठी गेले होते. इथेच झाडांमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात अनेक घोड्यांचाही मृत्यू झाला.

हे ही वाचा >> 'तो' होता Navy अधिकारी.. नुकतंच झालेलं लग्न, पत्नीसोबत आलेला हनिमूनला अन्...

"या घटनेत कन्नड लोकांचा बळी गेला आहे. घटनेची माहिती मिळताच मी एक एमरजन्सी मिटिंग बोलावली. मुख्य सचिव आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत घटनेची माहिती मिळवली. आम्ही घटनेवर बारकाईने नजर ठेवली आहे. शक्य तेव्हढी मदत केली जाईल", असं कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी एक्सवर पोस्ट करू म्हटलं होतं. 

    follow whatsapp