Pune Crime : जन्मदात्या बापानं 3 वर्षाच्या मुलाला गळा चिरुन संपवलं, पत्नीच्या चरित्र्यावर...

Pune Crime Latest News : रोज एका गुन्हेगारीच्या घटनेनं शहर हादरतंय. आता पुन्हा पुण्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका आयटी इंजिनिअरने आपल्या साडेतीन वर्षांच्या मुलाचा गळा चिरून खून केला आहे.

pune man kills son

pune man kills son

मुंबई तक

22 Mar 2025 (अपडेटेड: 23 Mar 2025, 01:01 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बापाने केला 3 वर्षाच्या मुलाचा खून

point

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि...

point

पुणे चंदनगगरमध्ये नेमकं घडलं तरी काय?

Pune Crime Latest News : रोज एका गुन्हेगारीच्या घटनेनं शहर हादरतंय. आता पुन्हा पुण्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका आयटी इंजिनिअरने आपल्या साडेतीन वर्षांच्या मुलाचा गळा चिरून खून केला आहे. एवढ्यावरच न थांबता या बापाने आपल्या मुलाचा मृतदेह नंतर एका निर्जन भागात फेकून दिला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत बापानं केलेल्या या कृत्यामुळे पु्णे जिल्हा हादरला आहे. 

हे वाचलं का?

निघृणपणे मुलाचा खून करणारा आरोपी माधव तिकेती (38) याला पुणे पोलिसांनी अटक केली. तसंच मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन ससून रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या आईने गुरुवारी दुपारपासून आपला पती आणि मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. चंदननगर पोलिसांनी  ही तक्रार दाखल करण्यात आली. लोहगाव, वडगावशेरी आणि हडपसर यासारख्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी तपास सुरू केला.

आरोपी बाप वडगावशेरीमध्ये एका लॉजमध्ये सापडला आणि...

तपासादरम्यान, गुरुवारी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास पोलिसांना एक फुटेज सापडलं. याज्यामध्ये वडील आणि मुलगा एकत्र दिसत होते. नंतर, संध्याकाळी 5  वाजेच्या सुमारास सीसीटीव्हीमध्ये आरोपी एकटा कपडे खरेदी करताना दिसला. त्यामुळे पोलिसांना संशय निर्माण झाला. पोलिसांनी त्याच्या मोबाईल लोकेशनचा मागावा घेत शोध घेतला. त्यावेळी आरोपी बाप वडगावशेरीमध्ये एका लॉजमध्ये सापडला. पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा तो दारूच्या नशेत होता.

हे ही वाचा >> Nashik Crime : नाशिकमध्ये भरदिवसा मुलीचं अपहरण, व्हायरल CCTV व्हिडीओच्यामागे निघाली वेगळीच घटना

शुद्धीवर आल्यानंतर, आरोपीनं हत्येची कबुली दिली. मुलाची हत्या केली आणि मृतदेह महामार्गाजवळ फेकून दिला असं सांगितलं. त्यानंतर पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन गेले. घटनास्थळावर मुलाचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळला.दरम्यान, डीसीपी (झोन 4) हिम्मत जाधव यांनी सांगितलं की, “आरोपी गेल्या दोन महिन्यांपासून बेरोजगार होता. पूर्वी तो आयटी इंजिनिअर म्हणून काम करत होता. त्याला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर खूप संशय होता. तसंच हा मुलगा त्याचाच आहे की नाही याबद्दलही त्याला शंका होती. या संशयानं तो गुरुवारी त्याच्या मुलाला बाहेर घेऊन गेला आणि नंतर त्याची हत्या केली.”

हे ही वाचा >> औरंगजेब महान आहे हे म्हणायची अबू आझमींना काय गरज होती? इम्तियाज जलील यांनी सांगितली भाजपची क्रोनॉलॉजी

चंदननगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे म्हणाल्या, “ा प्रकरणात तांत्रिकदृष्ट्या तपास करत आम्ही आरोपीचं ठिकाण शोधून त्याला अटक केली. मुलाला घेऊन जाताना त्यानं चाकू आणि ब्लेडही खरेदी केलं होता. दरम्यान, मुलाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.”मूळचा विशाखापट्टणमचा रहिवासी असलेला आरोपी 2016 मध्ये कामासाठी पुण्यात आला होता. तो आता पोलिस कोठडीत आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

    follow whatsapp