Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ 22 एप्रिलचा असल्याचं सांगितलं जात आहे.या व्हिडिओमध्ये दहशतवादी गोळीबार करताना दिसत आहेत. गोळी लागताच, पांढऱ्या शर्ट घातलेला माणूस जमिनीवर पडतो आणि आरडाओरडा सुरू होतो.
ADVERTISEMENT
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा एक एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ समोर आला आहे. दहशतवाद्याने प्रथम एका पर्यटकावर गोळीबार केला. त्यानंतर पूर्ण मैदानात गोळीबाराचा आवाज येऊ लागतो. व्हिडीओमध्ये दहशतवादी एकामागोमाग एका गोळ्या झाडताना दिसत आहेत. जंगलात लपून बसलेले दहशतवादी नंतर बाहेर येऊन पर्यटकांवर गोळीबार करत हल्ला करतात.
गोळीबार सुरू होताच सर्वत्र गोंधळ आणि आरडाओरड सुरू होते. यातून लोक स्वतःला वाचवण्यासाठी लपण्याचा प्रयत्न करतात. दहशतवादी अगदी निवडक पद्धतीने पर्यटकांना गोळी घालून त्यांना मारतात. घटनास्थळी पर्यटकांच्या जेवणाचा डबा आणि खाद्यपदार्थ विखुरलेले दिसत आहेत.
हे ही वाचा: इन्स्टाग्रामवर प्रेम, पतीची अडचण! पत्नी आणि प्रियकरानं मिळून काटा काढला, पण एका चुकीमुळे पकडे गेले
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू
22 एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. तसेच, 17 जण जखमी झाले. भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम तीव्र पद्धतीने सुरू केली आहे आणि जंगलात देखील शोध मोहीम सुरू आहे. दरम्यान, दहशतवाद्यांचे अड्डे उडवून देण्याची कारवाई देखील सुरू करण्यात आली आहे.
हे ही वाचा: इन्स्टाग्रामवर हवा करण्यासाठी पठ्ठ्याने थेट शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारालाच धमकी दिली, प्रकरण काय?
दहशतवाद्याच्या स्थानांवर जबरदस्त कारवाई
भारतीय सेना दल एकामागून एक दहशतवाद्यांचे अड्डे शोधून नष्ट करत आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्य दलांतर्फे कठोर कारवाई केली जात आहे. शनिवारी (26 एप्रिल) रोजी सकाळी आणखी दोन दहशतवाद्यांचे अड्डे उडवून देण्यात आले. भारतीय सैन्य दलाने लष्कराचा दहशतवादी एहसान अहमद शेख याचे दोन मजली घर आयईडी वापरून उडवून दिले आहे. तो पुलवामाच्या मुररानचा रहिवासी आहे. कुलगाममध्ये दहशतवाद्यांचे घरही उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
