Pune Crime : कोयते दाखवून दहशत पसवणाऱ्या गुंडांची पुणे पोलिसांनी काढली धींड

पुण्यात गेल्या अनेक काही दिवसांमध्ये कोयता घेऊन दहशत पसवणाऱ्या तरूण टोळ्यांची संख्या वाढलीये. तसंच गाड्यांची तोडफोड करणाऱ्या घटनाही वाढल्या आहेत.

Mumbai Tak

मुंबई तक

20 Feb 2025 (अपडेटेड: 05 Mar 2025, 04:20 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यातील दापोडीमध्ये गुंडांची धींड

point

पोलिसांची गुन्हेगारांवर कडक कारवाई

पुण्यातील दापोडी पोलिसांनी दहशत नि्र्माण करणाऱ्या गुंडांची धींड काढली. धारदार शस्त्र घेऊन हत्यारं भिरकावत, रिक्षाची तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न हे तरूण करत होते. अटक केलेल्या आरोपींची नावं नुमान खान, मुझफ्फर कुरेशी आणि सिप्ताने खान अशी आहेत. फिरोज इरशत शेख यांनी तोडफोडीबाबत दापोडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Delhi Chief Minister : परवेश वर्मा नाही, 'या' महिला नेत्याला मिळणार दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची संधी

15 फेब्रुवारी रोजी तिन्ही आरोपींनी मदरसा परिसर आणि पवार बस्ती परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन रिक्षांची तोडफोड केली होती. पाच ते सहा दुचाकींचे मोठे नुकसान झाले. त्याने हवेत विळा फिरवून दहशत पसरवण्याचा प्रयत्नही केला. 

दरम्यान, ही घटना १५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी घडली. याप्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुमान खान, मुझफ्फर कुरेशी आणि सिप्तान खान यांना बेड्या ठोकण्यात आल्या. घटनास्थळी, पोलिसांनी आरोपींना पवार वस्ती आणि तोडफोड झालेल्या परिसरातून धींड काढली. पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईचं नागरिकांकडून  स्वागत केलं जातंय.

हे ही वाचा >> Uddhav Thackeray : ऑपरेशन टायगरला उत्तर देण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन, नेत्यांच्या पहिल्या फळीकडे काय काय जबाबदारी?

पुण्यात गेल्या अनेक काही दिवसांमध्ये कोयता घेऊन दहशत पसवणाऱ्या तरूण टोळ्यांची संख्या वाढलीये. तसंच गाड्यांची तोडफोड करणाऱ्या घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी अशा समाजविघातक कृत्य करणाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

    follow whatsapp