Pune: स्वत:ला दोन मुलं असतानाही गजाननने पुण्यातील 'त्या' महिलेच्या मुलाचं का केलं अपहरण?

Pune Crime: एक महिलेने आपल्या ८ वर्षाच्या मुलाला 50,000 रुपयांमध्ये खरेदी करण्यास नकार दिल्याने आरोपी व्यक्तीने मुलाचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

गजाननने पुण्यातील 'त्या' महिलेच्या मुलाचं का केलं अपहरण?

गजाननने पुण्यातील 'त्या' महिलेच्या मुलाचं का केलं अपहरण?

मुंबई तक

• 05:31 PM • 03 Apr 2025

follow google news

पुणे: आठ वर्षांच्या मुलाच्या अपहरणामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये एकच खळबळ उडाली. हे अपहरण दुसऱ्या कोणी केले नाही तर एका ओळखीच्या व्यक्तीने केले आहे. या प्रकरणात, खंडणी विरोधी पथक आणि रेल्वे संरक्षण दलाने अवघ्या काही तासांतच अपहरणकर्त्यांपासून मुलाला वाचवले.

हे वाचलं का?

पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 8 वर्षांच्या मुलाच्या अपहरणामुळे येथे एकच खळबळ उडाली. हे अपहरण इतर कोणी केले नाही तर एका ओळखीच्या व्यक्तीनेच केले होते. या प्रकरणात, खंडणी विरोधी पथक आणि रेल्वे संरक्षण दलाने अवघ्या काही तासांतच अपहरणकर्त्यांपासून मुलाची सुटका केली.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मुलाच्या आईने तिच्या मुलाला विकण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने मुलाचे अपहरण केले. तो बाळाला विकत घेण्यासाठी मुलाच्या आईला 50,000 रुपये देत होता. खरं तर, 31 मार्च रोजी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती की, एका कुटुंबातील ओळखीच्या व्यक्तीने त्यांच्या आठ वर्षांच्या मुलाचे अपहरण केले आहे.

हे ही वाचा>> प्रियकरासोबत मिळून कट रचला, 42 वर्षीय महिलेनं पतीला संपवलं, 'त्या' फोनमुळे पोलिसांकडून 3 तासात उलगडा

सीसीटीव्ही फुटेज आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या मदतीने पोलिसांनी अपहरण केलेल्या मुलाला सुरक्षितपणे वाचवले आणि त्याच्या आईच्या स्वाधीन केले, शिवाय आरोपीला अटकही केली. आरोपीचे नाव गजानन पानपाटील असं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गजानन पाटनपाटील हा चार दिवसांपूर्वी चिंचवड येथे एका ओळखीच्या व्यक्तीला भेटण्यासाठी गेला होता. आरोपी अनेकदा आठ वर्षांच्या मुलाला चॉकलेट आणि बिस्किटांचे आमिष दाखवत असे. यामुळे तो मुलगा आरोपीकडे जायचा.

आरोपी गजाननला स्वत:ची दोन मुलं असतानाही का केलं या मुलाचं अपहरण? 

दरम्यान, त्याने मुलाच्या आईला तिचा आठ वर्षांचा मुलगा पन्नास हजार रुपयांना विकण्यास सांगितले. महिलेने या गोष्टीसाठी स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर 31 मार्च रोजी पती-पत्नी कामावर गेल्यानंतर आरोपी गजानन पानपाटीलने मुलाचे अपहरण केले आणि थेट चाळीसगावला घेऊन गेला.

हे ही वाचा>> माजी नगरसेविकेच्या मुलाकडून तरूणीवर लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार, दोन वेळा करायला लावला गर्भपात

पोलिसांना याची माहिती मिळताच खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी तपास सुरू केला. त्यांनी भुसावळ पोलीस, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, चाळीसगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधला आणि अपहरणकर्ता गजानन आणि महिलेच्या मुलाचे सीसीटीव्ही फुटेज पाठवले. 

अखेर आरोपीला चाळीसगाव येथे ट्रेनमधून ताब्यात घेण्यात आले. रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने आरोपीला पिंपरी-चिंचवडला आणण्यात आले. गजानन पानपाटीलने पोलिसांना कबूल केले की, त्याच्या आईने मुलाला 50,000 रुपयांना विकण्यास नकार दिल्याने त्याने त्याचे अपहरण केले. 

गजानन पानपाटील यांना स्वतः दोन मुले आहेत. मग तो अपहरण केलेल्या मुलाला कोणाच्या स्वाधीन करणार होता? किंवा त्याला या मुलाला इतर कोणाला विकायचे होते का? पोलीस आता या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

    follow whatsapp