Pahalgam Terror Attack: "माझा मुलगा हे करू शकत नाही..." दहशतवाद्याच्या आईने केला मोठा खुलासा

Jammu Kashmir Terror Attack:पहलगाम मधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई करत आहेत. आदिलला या भीषण हल्ल्यातील मुख्य संशयित मानलं जात आहे. त्याच्या आईने याबाबतीत मोठा खुलासा केला असल्याची माहिती समोर आली आहे.

दहशतवाद्याच्या आईने केला मोठा खुलासा

दहशतवाद्याच्या आईने केला मोठा खुलासा

मुंबई तक

28 Apr 2025 (अपडेटेड: 28 Apr 2025, 12:35 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याबद्दल मोठा खुलासा

point

दहशतवाद्याच्या आईनेच केला खुलासा

point

दहशतवादी आदिलची आई नेमकं काय म्हणाली?

Pahalgam Terror Attack: पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई करत आहेत. यातच सुरक्षा दलांनी आदिल हुसैन थोकरचे घर उद्ध्वस्त केलं आहे. आदिलला या भीषण हल्ल्यातील मुख्य संशयित मानलं जात आहे. आदिलच्या घरच्यांनी त्याला सरेंडर होण्याची विनंती केली आहे, जेणेकरुन त्याच्या घरची मंडळी शांततेत जीवन व्यतीत करू शकतील. 

हे वाचलं का?

2018 पासून काहीच संपर्क नाही- कुटुंबियांचा दावा

TOI च्या रिपोर्टनुसार, शहजादा बानोच्या कुटुंबाने 2018 पासून आदिलशी कोणताच संपर्क झाला नसल्याचा दावा केला आहे. सध्या या प्रकरणात आदिलच्या वडिलांना आणि त्याच्या भावाला ताब्यात घेण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, आदिलची आई शहजादा बानो यांनाही एका दिवसासाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.

काय म्हणाली आदिलची आई?

आदिलच्या आईच्या मते, त्यांचा मुलगा लोकांची अशाप्रकारे हत्या करू शकत नाही. मात्र, तो दोषी असल्यास सुरक्षा बल त्याच्या विरोधात कारवाई नक्कीच करू शकतात, असं देखील त्याच्या आईने म्हटलं. 

हे ही वाचा: "तो टॅक्सी चालक अतिरेक्यासारखा वागत होता...", कुडाळच्या महिलेनं सांगितला धक्कादायक अनुभव

सुरक्षा दलांची कारवाई

तसेच, अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बैसरन खोऱ्यात झालेल्या हल्ल्यात आदिलने पाकिस्तानी दहशतवाद्यांची मदत केली होती. गेल्या 48 तासांमध्ये जम्मू काश्मीरमधील सुरक्षा दलांनी बऱ्याच दहशतवाद्यांचे घर उडवून लावल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये शोपियां जिल्ह्यातील लष्कर-ए-तैयबचा सक्रिय दहशतवादी अदनान शफीच्या घराचा देखील समावेश आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर लष्कराने ही कारवाई केली. या हल्ल्यात 26 लोकांना आपला जीव गमवावा लागला. 

'या' दहशतवाद्यांच्या घरावर झाली कारवाई

'इंडिया टूडे'च्या रिपोर्टनुसार, कुपवाडामध्ये सुरक्षा दलांनी लष्करमधील दहशतवादी फारुख अहमद याच्या घरावरही बॉम्बने हल्ला केला होता. फारूक सध्या पाकिस्तानात राहुन दहशतवादी करवाया करत असल्याचं वृत्त मिळालं आहे. 

हे ही वाचा: "अक्षय शिंदेलाही पहलगाम मधल्या निरपराध भावांइतकंच...", किरण मानेंची काय म्हणाले, निशाणा कुणावर?

फारूक व्यतिरिक्त या हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या संपत्तीवर कारवाई करण्यात आली. यामध्ये अनंतनागमधील ठोकरपुरा येथील आदिल हुसैन ठोकर, पुलवामा येथील अहसान उल हक शेख, त्रालचा आसिफ अहमद शेख, चोटीपोरा, शोपियां येथील शाहिद अहमद कुट्टे, कुलगाममधील मतलहामा येथील जाहिद अहमद गनी, शोपियांचा आमिर अहमद, जमील अहमद शेर आणि बंदीपोरा येथील आमिर नजीर यांचा समावेश आहे.

रिपोर्टनुसार, बिजबेहरा येथील लष्कर दहशतवादी आदिल हुसैन ठोकरचे घर IED ने उडवून दिले, तसेच त्रालमधील आसिफ शेखचे घर बुलडोझरने पाडण्यात आले.

    follow whatsapp