Gold Price Today In India: करवाचौथ आधी सलग तिसऱ्या दिवशी सोनच्या भावात वाढ झाली आहे. सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 78990 रुपयांवर पोहोचला आहे. आज शनिवारी 19 ऑक्टोबरला राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 79,140 रुपयांवर पोहोचला आहे. तसच चांदीचा भावातही वाढ झाली आहे. चांदी प्रति किलोग्रॅम 99,100 रुपयांवर पोहचली आहे. देशातील 15 मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमतीत किती रुपयांनी वाढ झाली आहे? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
ADVERTISEMENT
दिल्ली, नोएडा आणि गुरुग्राममध्ये सोन्याचा भाव
दिल्लीत 22 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत 72560 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत जवळपास 79140 रुपये आहे.
मुंबई आणि कोलकातात सोन्याचा भाव
मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72410 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78990 रुपये आहे.
चेन्नई आणि बंगळुरुत सोन्याची किंमत
चेन्नई आणि बंगळुरुत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72410 रुपये झाली आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 78990 रुपयांवर पोहोचला आहे.
अहमदाबाद आणि भोपाळमध्ये सोन्याचा भाव
अहमदाबाद आणि भोपाळमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची रिटेल किंमत 72460 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 79,040 इतकी आहे.
हे ही वाचा >> Horoscope In Marathi: आज शनिवारी 'या' राशींची साडेसाती होईल दूर? पण काही राशींवर कोसळेल समस्यांचा डोंगर
चंदीगड आणि जयपूरमध्ये सोन्याचे दर
या दोन्ही शहरात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72560 रुपये झाली आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर जवळपास 79140 रुपयांवर पोहोचले आहेत.
भुवनेश्वर आणि हैदराबादमध्ये सोन्याचे भाव
या दोन्ही शहरात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72410 रुपयांवर पोहोचली आहे. तर 24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमचा सोन्याचा रेट 78990 रुपये झाला आहे.
लखनऊमध्ये सोन्याचा भाव काय?
लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72560 रुपयांवर पोहोचली आहे. तर 24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमचा सोन्याचा रेट 79140 रुपये झाला आहे.
पटनामध्ये सोनं किती रुपयांनी महागलं?
पटनामध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72460 रुपयांवर पोहोचली आहे. तर 24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमचा सोन्याचा रेट 79040 रुपये झाला आहे.
ADVERTISEMENT